Chhatrapati Shivaji Maharaj | छत्रपती शिवाजी महाराज | भाग 5 | Mahendranath Prabhu
![]() |
Chhatrapati Shivaji Maharaj |छत्रपती शिवाजी महाराज | भाग 5 |Mahendranath Prabhu |
" अहो ते पाहणारच आहे, परंतु वजीरे आलम ने आम्हाला तातडीने अहदनगरला कशाला बोलविले आहे, ते पण बादशहा समोर,आपल्या काही सुभ्याच्या विषयी बोलायचे आहे का ? काही कळत नाही."
पुढे
मालोजी राजेंनी भंडारा ठेवलेला असतो. त्यात साधू, संत, फकीर , मौलवी जेवून जातात तेव्हा ते त्यात जातीने लक्ष
घालतात. त्यांच्या मते साधू, संत , फकीर , मौलवी हेच खरे
देवाचे भक्त तेव्हा त्यांना काही कमी पडू नये. याचे काळजी
घेतात. तेव्हा ते आपल्या बंधुस ही म्हणाले की, आमच्या मागे
तुम्ही असेच हे चालू ठेवायला हवे आहे." तेव्हा विठोजी राजे
म्हणाले," हे तुम्ही काय बोलत आहात ? तुम्हालाच हे सारे
करायचे आहे." तेव्हा मालोजी राजे म्हणाले," विठोजी, उद्याचे
कुणी सांगावे ? आम्ही असू किंवा नसू ते. म्हणून आम्ही आजच
सांगून ठेवतोय की आम्ही सुरू केलेली कामे बंद पडता कामा
नये, जसे की आम्ही श्रीशिखर सिंगणापुर मध्ये पाण्याची फार टंचाई आहे, खूप दूर हून पाणी आणावे लागते, म्हणून आम्ही
श्रीशिखर सिंगणापुरच्या पायथ्याशी भिंत बांधून तलाव बांधून
येणाऱ्या यात्रेकरूंना पिण्याच्या पाण्याची सोय आम्ही करू
इच्छित आहोत. म्हणून आम्ही तेथे तळे बांधण्याचे काम सुरू केले आहे. आम्ही म्हणजे ज्योत्या आणि त्यांची सर्व मंडळी जोमाने काम करत आहेत. " त्यावर ज्योत्या म्हणाला," नाही
धाकटे मालक, हे थोरले मालक सुध्दा आमच्या संगती कुदळ
मारायला असतात. म्हणजे आम्हाला तसा सदैव भास होतो."
त्यावर मालोजी राजे उठून त्यांच्या जवळ येत म्हणाले की, आमची पण फार मनापासून तशी इच्छा होती. पण नाही जमले.
परंतु तुमची तशी श्रद्धा आहे ना, आम्ही तुमच्या सोबत असतो
म्हणून. हेच आमच्या साठी खूप आहे. जा कामाला लागा."
असे बोलून आपल्या धाकट्या बंधू कडे नि मुलांकडे पाहत
ते पुढे म्हणाले," लक्षात ठेवा की हे काम आमच्या नंतर ही
बंध पडता कामा नये." त्यावर कोणीच काही बोलत नाही.
वजीरे आलम मलिक अंबर आणि मीआण राजू बादशहाकडे म्हणजेच निजाम कडे गेलेले असतात. मलिक
अंबर ने मालोजी राजेंची मनसबदारी वाढविण्यासाठी शिपारस केलेली असते आणि त्याचे कारण ही सांगितलेले असते. तेव्हा
बादशहा खुश होऊन मालोजी राजे नि विठोजी राजे यांना
दीड हजारी मनसबदारी वरून पाच पाच हजारी ची मनसबदारी
दोन्ही बंधूंना बहाल केलेली असते. तेव्हा वजीर आलम मलिक
अंबर म्हणाला की मी आजच खलिता पाठवितो. " असे म्हणून
मुजरा करून निघून गेला एक कटाक्ष मीआण राजू कडे टाकायला विसरला नाही. खरे सांगायचे तर मीआणचा त्यास
विरोध असतो. पण तो बादशहा पुढे तो जाहीर करू शकत
नव्हता. तरी देखील तो म्हणालाच की , मुझे लगता है, आप
उन्हें बढ़ावा देखकर गलती कर रहे है ।" तेव्हा बादशहा म्हणाला, " आप हमारी गलती गिनने के बजाए अगर अपना
काम ढंग से करे तो बेहत्तर होगा ।" असे म्हणून बादशहा
निजाम तेथून निघून गेला. परंतु मीआण राजू ला ते अजिबात
आवडले नाही. तो आतल्या आंत जळत होता. पण इलाज
नव्हता.
ज्योत्याजी आले तसे शहाजी नि विचारले की झरे लागलेत
की नाही ?" त्यावर ज्योत्याजी म्हणाले की, हो लागलेत ना,
म्हणजे सध्या दोन तीनच लागले आहे, परंतु अजून खोलवर खोदल्यावर अजून झरे सापडण्याची शक्यता आहे." शहाजी
नि विचारले," पण पुढे ?" तसे संभाजी उद्गारला," पुढे काय म्हणजे लोकांना पाणी मिळेल ना काय ज्योत्याजी ?" पण
शहाजीच्या मनात काय आहे, हे बरोबर विठोजी नि हेरले.
म्हणूनच की काय ते म्हणाले की, शहाजी ना काहीतरी वेगळाच विचार आहे." त्यावर मालोजी म्हणाले," हो का ? मग सांग बरं काय विचार आला तुमच्या मनात ?" त्यावर शहाजी म्हणाले,
" मला वाटतं की आपण तळे बांधत आहोत हे पुण्याचेच
काम आहे परंतु हे पाणी कायम लोकांना मिळत राहावे यासाठी चिरेबंदी बांधून काढायला हवे." मालोजी राजे नि विठोजी राजे
या दोघांना ही शहाजीचा विचार पसंद पडला. त्यांनी त्याच्या
कडे अभिमानाने पाहिले. तेव्हा ज्योत्याजी उद्गारला की , पण
सरकार ह्याला फार खर्च येईल." तेव्हा मालोजी राजे म्हणाले
की, हा विचार शहाजीच्या मनात आला म्हणून तो महत्वाचा
आहे, असे नव्हे तर आमच्या कुणाच्या ही मनात तो विचार आला असता तरी आम्ही त्याचा पाठ पुरावा केलाच असता. असे बोलून शाहजी कडे पाहत मालोजी राजे म्हणाले," शहाजी, आता मला सांगा हा विचार तुमच्या मनात कसा आला बरं ?" त्यावर शाहाजी म्हणाले," आपण वाड्यात सुरक्षित राहतो. कारण बाहेरून तटबंदी चिरेबंदी आहे, मग जे चिरे आपल्याला सुरक्षित ठेवू शकतात. ते पाण्याला पण सुरक्षित ठेवू शकतील. असा विचार माझ्या मनात आला बस !" त्यावर मालोजी म्हणाले," बरोबर आहे तुमचं. कारण चिरेबंदी नसेल तर पाण्याला जायला अनेक वाटा फुटतील. तेव्हा चिरेबंदी थाल तर बांधायला पाहिजे. तेव्हा खर्चाची चिंता करू नका. काम एकदम भक्कम झाले पाहिजे. शिवाय हा विचार मनात यायला सुध्दा त्या शंभू महादेव कारणीभूत आहेत." तेव्हा ज्योत्यानी होकारार्थी डोलावली. इतक्यात एक संदेश वाहक आला नि म्हणाला," सरकार आज्ञा आहे का ?" तेव्हा मालोजी राजे म्हणाले," या sss " असे बोलून मालोजी राजे त्याच्या हातून फर्मान घेऊन वाचतात. इतक्यात ज्योत्या जी उद्गारला की , एकवेळ सर्वांनी येऊन पाहून जा." त्यावर मालोजी राजे म्हणाले," आम्ही आलो असतो, परंतु आम्हाला हे फर्मान आलेय जायला हवं."
लखुजी जाधवांच्या तिन्ही बायकांनी त्यांच्या जवळ हट्टच धरला की अगोदर तुम्ही जिजांच्या लग्नाचा निर्णय घ्या. मगच
आम्ही तुम्हाला वजीरे आलम जवळ जाण्यास देवू !" शेवटी
लखुजी जाधवांनी सर्वांना सदरे वर बोलविले. सर्वजण आले
होते पण त्याचे बंधू जगदेव राव आणि त्यांची पत्नी आली
नव्हती म्हणून त्यांना बोलविण्यास सगुणा बाईला सांगितले.
पण इतक्यात जगदेव राव आणि त्यांची पत्नी तिथं हजर
होतात. तेव्हा त्या सर्वांसमोर जिजांच्या सोयरिकीचा निर्णय घेतला गेला. लखुजी जाधवांनी जाहीर केलं की आमच्या
तिन्ही बाईसाहेबांची इच्छा आहे की, जिंजाची सोयरिक
वेरुळचे मालोजी राजे भोसले यांचे थोरले चिरंजीव शहाजी राजे
यांच्याशी करावी. तेव्हा आम्ही काही त्यांच्या इच्छेविरुद्ध नाही
आहोत. अर्थात आमची त्यास समत्ती आहे." असे बोलून ते
आपल्या बंधू जगदेव राव कडे पाहत पुढे म्हणाले की, जगदेव राव आणि गोमाजी तुम्ही दोघांनी वेरुळ ला जाऊन मालोजी राजे यांची भेट घ्यायची आहे नि त्यांच्या समोर हा प्रस्ताव ठेवायचा आहे." तेव्हा जगदेव रावांनी लगेच होकारार्थी मान
डोलावली. त्या सर्वांचे बोलणे सुरू असताना सगुणा बाई
कान देवून ऐकत असते. आणि जसे त्यांचे बोलणे पूर्ण होते
तशी ती गुपचूप कुणाला तरी जाऊन भेटते नि त्याच्या कानात
पूर्ण माहिती देते. त्यानंतर जगदेव राव आणि गोमाजी वेरुळला जायला निघाले आणि लखुजी जाधव स्वतः वजीरे आलम
मलिक अंबर कडे जायला निघाले. परंतु रस्त्यात त्या दोघांना
वेरुळ ला जाऊ द्यायचे नाही. असा विचार करून मीआण
राजू ने कासिम खान ला त्या दोघांना अडविण्यासाठी पाठविले.
परंतु त्याला सांगितले की आमचं नाव कोठेही यात आले नाही
पाहिजे. तेव्हा कासिम खान म्हणाला की आप बेफिकिर रहिए
जगदेव राव को मैं छोडूंगा नहीं, अगर नहीं माना तो अपनी
जान गवा बैठेगा ।"असे बोलून त्याने मीआन राजू का मुजरा
केला नि निघाला. आणि त्या दोघांना त्याने रस्तात अडविले.
त्याचे म्हणणे असते की तुम्ही आजच्या दिवस माझ्या कडे थांबा. मग उद्या पुढे जा." परंतु बोलण्याच्या ओघात तो पटकन सत्य बोलून गेला. तेव्हा जगदेव राव ना प्रश्न पडला की आपण वेरुळ ला जाणार आहे, हे ह्याला कसे कळले ? याचा अर्थ ह्याला त्या मिआण राजू ने पाठविले असावे. पण का ? परंतु त्या विषयी विचारण्याची ही वेळ नव्हे ! ह्याला चकवणे हेच योग्य असा विचार करून ते म्हणाले की, तू चल पुढे आम्ही येतो मागोमाग !" तो जसा पुढे चालू लागला तसे हे त्याच्या मागोमाग न चालता त्याच्या विरुद्ध दिशेने निघाले. त्याला का कुणास ठाऊक संशय आला नि त्याने मागे वळून पाहिले तेव्हा त्याला समजले की ते दोघे आपल्या मागोमाग येत नसून वेरुळच्या दिशेने निघाले आहेत. हे पाहून त्याला भयंकर राग आला नि स्वतःशीच म्हणाला की, माझ्याशी धोके बाजी काय आता बघतोच मी तुम्हाला ." असे म्हणून तो निघालाच.
मालोजी राजे जेव्हा वजीरे आलम ची भेट घेतात. तेव्हा
त्यांना वाटते की आपल्या कडून काहीतरी चुकलं असावे.
म्हणून वजीरे आलम ने आपल्याला बोलविले असावे.परंतु
वजीरे आलम मलिक अंबर ची भेट घेतल्यानंतर त्यांना समजले
की बादशहा ने खुश होऊन आपल्या पाच हजार मनसबदारी
बहाल केली आहे. ते ऐकून त्यांना फार अत्यानंद होतो. ते
मलिक अंबर चे आभार मानतात. पण इतक्यात ते पुढे जे
म्हणाले त्यांच्या मनात शंका निर्माण झाली. मलिक अंबर
त्यांना म्हणाले की तुमचे पाच हजारीची मनसबदारी आणि विठोजीचे पाच हजाराची मनसबदारी ऐकून भोसले दहा
हजारी मनसबदार झाले, अर्थात आपण आता लखुजी राव
जाधवांच्या बरोबरीचे झाले. म्हणजे ते बारा हजार आहेत तर
तुम्ही दहा हजार मनसबदारीचे जहागीरदार झालेत तर आता
तुम्हाला त्यांच्याशी सोयरिक करायला काहीच हरकत नाही."
हे ऐकून थोडे विचलित झाले खरे, पण लगेच स्वतःला सावरून
म्हणाले की हे सारे लखुजी जाधवाशी आमची सोयरिक व्हावी
म्हणून तर केले नसेल ना ? " त्यावर मलिक अंबर त्यांच्या
संशय दूर करत म्हणाले," नाही. हे सारे तुमच्या पराक्रमाचे
बक्षीस आहे, म्हणजे तुम्ही सारखा सारखा विजय हो मिळविला
त्या बद्दल बादशहा हजरत ने तुम्हाला बहाल केले आहे. चला
बादशहा ने बोलविले आहे.
जिजाऊंना गोदाताई कडून समजले की तुमचे लग्न होणार
आहे म्हणून. तेव्हा त्यांना त्याचे फार वाईट वाटले. म्हणजे
घरात आपल्या लग्नाचे वार्ता बोलल्या जात आहेत नि आपल्याला कुणीच कसे काही बोलले नाही. म्हणून त्या आपल्या तिन्ही आऊ सांहेबांवर नाराज होतात. तेव्हा त्यांच्या आऊ साहेब त्यांची माफी मागतात. त्या म्हणतात की, आमचं चुकलं खरं ! आधी तुम्हाला सांगायला हव होते. पण त्याचा राग धरू नका. आमच्या ध्यानात नाही आलं." असे सांगून त्या वेळ
मारून नेतात. संध्याकाळी जेव्हा थोरल्या देवाला बत्ती वात
करत असतात. तेव्हा तेथे जगदेव राव यांच्या पत्नी येतात नि
रडायलाच लागतात. तेव्हा म्हाळसा बाई त्यांना रडण्याचे कारण
विचारले. तेव्हा त्यांनी दुपारी आकाशात वट वाघुल, घुबड
घिरट्या घालतात दिसतात. त्यांना वाटले की काहीतरी अपशकुन आहे, म्हणून त्यांनी शास्त्री बुवांना त्या बद्दल विचारले तर शास्त्री बुवा म्हणाले की पंचाग लागले आहे, ह्या चार पाच दिवसात काहीतरी अघटीत घडण्याची शक्यता आहे. हे ऐकून त्यांना एकदम धक्काच बसला. कारण गडी मध्ये त्यांचे यजमान
पण नाहीयेत आणि लखुजी जाधव पण नाहीयेत. म्हणून
त्या पळत थोरल्या जाऊ बाईना सांगायला आल्या. त्यांचे
वक्तव्य ऐकून म्हाळसा बाईंच्या मनात ही नको नको ते
विचार येऊ लागले. मग त्या त्यांचा हात पकडुन देवी माता
रेणुका जवळ येतात नि देवीला हात जोडून प्रार्थना करतात
की रेणुका माते जे काय संकट येणार असेल ते तू दूर कर
आम्हाला काय संकट येणार आहे ते. पण तुला सर्व माहित
आहे, म्हणून तूच त्याचे निवारण कर."
कासिम खान ने चार हबशी ना त्या दोघांना अडविण्या साठी पाठविले आणि त्या हबश्यानी त्या दोघांना अडविले देखील. परंतु त्यांना आपली खरी ओळख न सांगता आपण
स्वतः लुटारू असल्याचा सांगितले. इतकेच नाहीतर तुमच्या
जे काही आहे,ते आम्हाला देवून टाका. " असे म्हतल्या मुळे
त्या दोघांना त्या चारांचा संशय येण्याचे कारणच नव्हते.
आणि म्हणून त्या दोघांनी आपल्या कडे काही नसल्याचे
सांगितले. परंतु ते ऐकणार होते थोडेच. म्हणजे त्यांचा मुख्य
उद्देश त्यांना लुटायचा नव्हता तर त्यांना बंधिस्थ करावे अथवा
जिवानिशी ठार मारवे असाच हुकूम होता त्या चौघांना. पण
घडले मात्र उलटेच. जगदेव आणि गोमाजी या दोघांनी त्यांच्याशी
युद्ध करण्यासाठी आपली तलवार उपसली नि त्यात त्यांना
यश देखील आले. या युद्धात त्या चौघांचा त्या दोघांनी खात्मा केला. परंतु त्यांच्या सोबत झालेल्या चकमकीत ते दोघेही जखमी झाले. परंतु दोघेही वेरुळला पोहोचले. तिथं उमाबाईं आणि विठोजी राजे यांनी त्यांचे स्वागत केले. ते दोघेही जखमी असल्याचे पाहून त्या दोघांवर वैद्य बुवा कडून उपचार करविला. जगदेव राव त्यांना सोयरिक बद्दल सांगू इच्छित होते. परंतु विठोजी राजे म्हणाले," सोयरिकचे नंतर पाहू ! प्रथम
तुमच्या जखमेवर उपचार तर करू द्या." त्यावर जगदेव राव
म्हणाले," ह्या जखमांचे एवढं काही त्रास नाही आम्हाला. कारण
तालमी मध्ये अश्या अनेक जखमा होतात." परंतु विठोजी राजे
नि उमाबाई त्यांचे काहीही ऐकून घ्यायला तयार झाले नाहीत. म्हणाले आधी उपचार करून घ्या. नाहीतर आमच्या आत्याबाई आमच्यावर रागवतील." तसे विठोजी पण म्हणाले," आणि
दादासाहेब देखील आमच्यावर रागवतील. तेव्हा तुम्हाला उपचार
हा करून घ्यावाच लागेल. शेवटी नाईलाज झाला दोघांचा. त्या
दोघांनी वैद्य कडून उपचार करून घेण्याची तयारी दर्शविली.
विठोजी राजे, उमाबाई ना म्हणाले," वहिनी, आमचं विश्वासच बसत नव्हता की लखुजी राजे कडून सोयरिकीचा प्रस्ताव
येईल म्हणून." त्यावर उमाबाई उद्गारल्या की, पण आम्हाला
खात्री होती आणि आमचं ह्या सदर्भात बोलणे देखील झाले
होते स्वारी शी ! पण ते म्हणाले, त्यांनाच काय ते ठरवू दे. आता
तर आम्हाला फक्त जिजाबाईच दिसताहेत."
" हो का ? उत्तम झालं तर ! आता दादासाहेब येईपर्यंत. आपण त्यांचा चांगला आदरातिथ्य करू, म्हणजे अतिथी देवोभव !"
" हो त्यांना बोलायला जागाच ठेवायची नाही मुळी !" असे
बोलून दोघेही खुश होतात.
मीआण राजू लखुजी जाधवांना भेटून त्यांची अगोदर प्रशंसा
करतो नि मग मालोजी राजे यांच्या विरुध्द त्यांचे कान भरायला
सुरुवात करतो. लखुजी राजे आपको पता है की अब मालोजी
राजे को भी पांच हंजार की मनसबदारी दी गई है, फिर भी वो
आपकी बराबरी नहीं कर सकते. आपको मनसबदारी यूंही नहीं
मिली है, आपकी पुरखोकी मेहनत है, और रिश्ता कभी भी
बराबरी में होता है ना ? बाकी आपकी मर्जी !"असे बोलून तो
तेथून चालता झाला. लखुजी जाधवांना देखील त्याचे म्हणणे पटले. त्यांचा मनात विचार आला की, सोयरिकीचा निर्णय घेण्यास आपण फार घाई केली. पण लगेच मनात दुसरा विचार आला की फक्त प्रस्ताव तर पाठविला आहे. प्रस्ताव पाठविला म्हणजे सोयरिक झाली असे थोडेच आहे. असे म्हणून ते स्वतःची समजूत काढतात. पण त्याच वेळी वजीरे आलम मलिक अंबर तेथें येतात आणि स्वतःशीच बडबडताना पाहून त्यांनी विचारले की, क्या हुआ लखुजी राजे किस सोच में डूबे हो ?"
" मैं नहीं तो."
" झूठ मत बोलो हमने देखा है,आपको खुद से ही बाते करते हुए ।" तेव्हा लखुजी राजे ने हसून उत्तर दिले की, वो कुछ नहीं
ऐसे ही । "
" कुछ तो है, लेकिन आप हमे बताना नही चाहते खैर कोई
बात नहीं, लेकिन हम आपको एक खुश खबर देना चाहते है ।"
" वो क्या ?"
" मालोजी राजे को पांच हजारी मनसबदारी देने का फैसला
बादशाह हजरत ने किया है ."
" पता है ।"
" कैसे ? मेरा मतलब है की आपको किसने बताया ?"
" मीआण राजू ने ."
" ओह समज गया."
" क्या समझ गये आप ?"
" यही की मीआण राजू ने आपको कहा यही ना ?"
" जि हाँ ."
" फिर क्या सोचा है आपने ?"
" किस बारे में ?"
" भूल गए पिछली बार हमने आपसे भोसले और आपकी रिश्तेदारी के बारे में सोचने के लिए कहा था । क्या आपने
उस बारे में कुछ सोचा ?"
" नहीं क्योंकि वो बात तो हम कब के भूल चुके है ।"
" क्यों ? क्या खराबी भोसले घराने में ?"
" खराबी कुछ नहीं, लेकिन रिश्ते ऐसे नहीं जुड़ते है ना कुछ
सोचना पड़ता है ।"
" इस में सोचना क्या है ? दोनो एक दूसरे को अच्छी तरह
जानते भी हो, और दोनो का ससुराल भी एक है । फिर क्या
दिख्खत हैं आपको ? " त्यावर लखुजी जाधव काहीच बोलले नाहीत. तसा मलिक अंबर पुढे म्हणाला," देखो ज्यादा सोचने मे समय मत नष्ट करो बाकी आप खुद ही समझदार हो ।" असे बोलून मलिक अंबर तेथून निघून गेले. तसे लखुजी जाधव स्वतःशीच उद्गारले की, ह्या दोन्ही वजीराना सोयरिक बद्दल
काय पडले आहे तेच कळत नाहीये."
संध्याकाळ झाली तेव्हा त्या दोघांनी पुन्हा तोच सोयरिकीचा
विषय काढला. परंतु विठोजी राजे आणि उमाबाई नि त्याचे
लक्ष दुसरीकडेच वळविण्याचा प्रयत्न केला. परंतु जगदेव राव म्हणाले," मालोजी राजे कुठं दिसत नाहीत ते." तेव्हा विठोजी राजे म्हणाले की, आमचे दादा साहेब , अहमदनगरला गेले आहेत." तेव्हा जगदेव राव म्हणाले की, आमचे दादासाहेब पण अहमद नगरलाच गेले आहेत, म्हणून त्यांनी आम्हाला सोयरिकीची बोलणी करायला पाठविले आहे." तेव्हा विठोजी म्हणाले की , " आमचे दादा साहेब अहमदनगरहून आल्यानंतरच सोयरिकीची बोलणी होतील. त्यानंतर ते दोघेही लगेच निघणार होते. परंतु उमाबाईनी आगृह करून त्या दोघांना एक रात्र वस्तीला ठेवून घेतले. तेव्हा जगदेव राव म्हणाले,
" आम्हाला शहाजी राजेंना भेटायचं होतं भेटू शकतो का ?"
त्यावर उमाबाई उद्गारल्या की, हो अवश्य. मी आता पाठवते त्यांना." असे बोलून ते दोघेही निघून गेले. तेव्हा गोमाजी
म्हणाला की , आपली सोय झाली ; परंतु आपल्या घोड्यांची
सोय बाकी आहे, तेव्हा मी जाऊन येतो. इतक्यात तिथं संभाजी राजे येतात त्यांना पाहून गोमाजी म्हणाले," संभाजी राजे
घेड्याचा पागा कुठं आहे ?" इतकं विचारताच संभाजी राजे
त्यांच्यावर चिडून म्हणाले की, मघापासून बुड ठेकुन बसले
तेव्हा नाही कळाले? आता विचारताय ?" तेवढ्यातच धोड्यांच्या ओरडण्याचा आवाज आला. तसे संभाजी राजे म्हणाले ते बघा तिकडे आहेत. इतक्यात शहाजी राजे तेथे आले त्यांनी लगेच जगदेव रावांचे चरण स्पर्श केले. जगदेव रावांनी त्यांना आशीर्वाद देत पुढे म्हंटले की, हा फरक आहे दोघां मधला. परंतु संभाजी राजेंना त्याचे काहीच वाटले नाही. उलट उद्धट उत्तर दिले.त्यावर शहाजी राजे त्यांचा पक्ष घेत म्हंटले," काकासाहेब , आपला अपमान व्हावा असा मुळीच दादासाहेबाचां उद्देश नव्हते. तसे ते वरून फणसा सारखे कडंक दिसले तरी आतून मधाळ गऱ्यावाणी आहेत." त्यावर संभाजी राजे उद्गारले," मनात जे आहे ते बोलून टाकायचे. घाबरायचे कारण काय ? आपण कुणाच्या बा चे थोडेच खातोय." त्यांचे वर्तन पाहून जगदेव राव म्हणाले," बाप रे सगळे असेच आहेत का ? पण शहाजी राजेनी जगदेव रावांची माफी मागितली. आणि आपल्या मधुर वाणी ने त्यांचे मन ही जिंकले. त्यामुळे ते एक रात्र राहण्याचा निर्णय घेतात.
कासिम खान त्या दोघांना रोखण्यास अयशस्वी झाल्याचे सांगतो. त्यावर मीआण राजू त्याच्या वर भयंकर चिडला नि म्हणाला की, तुम्हे एक काम करने को कहा था, वो भी तुमसे हुआ नहीं अब क्या करूं मैं तुम्हारा बोल." तेव्हा कासिम खान म्हणाला," आप चिंता न करे, मैं उनको ऐसी बात कही है, की उनका रिश्ता कभी नहीं होगा ।" त्यावर मीआण राजू बोलला की, तुम अब जाओ यहांसे ।" तसा कासिम खान मुकाट्याने निघून गेला. तसा मीआण राजू स्वतःशीच उद्गारला की, अब हमे ही कुछ करना होगा ।"
मलिक अंबर आणि बादशहा बुध्दी बळाचा खेळ खेळायला
बसले . त्या वेळी मलिक अंबर बुद्धिबळाच्या खेळा विषयी
विशेषतः सांगत असतो की , तेव्हा बादशहा ने त्याला विचारले
की , आप कुछ फरमारहे थे। मतलब यहाँ और काबुल और कंधार में यह खेल अलग अलग खेला जाता है।" तेव्हा मलिक
अंबर बुध्दी बळाच्या खेळातील फरक स्पष्ट करीत म्हणाला की, कुछ ज्यादा फर्क नहीं है, असे बोलून मलिक अंबर वजीर उचलून बादशाहा ला दाखवत म्हणाले," यहां इसे वजीर कहते है, और हमारे यहां उसे मल्लिका कहते है," बादशहा खुश होऊन म्हणाला की,बहुत खूब !" तसा मलिक अंबर पुढे म्हणाला की, यह एक प्यादा हैं, जो इधर दो घर चलता है, और हमारे यहां सिर्फ एक घर चलता है।" बादशाहा उद्गारला," बहुत अच्छा ।" मालिक अंबर एक और प्यादा दिखाकर बोला की, यह प्यादा सीधा मल्लिका बन जाता है ।" तेव्हा बादशहा म्हणाला," इसका मतलब यह हुआ की यहां से हाथी भी है दोनो तरफ से आपके प्यादे हमारे तक्त की ओर बढ़ रहे है ।" तेव्हा मलिक अंबर न समजून बोलला की, मैं कुछ समझा नहीं ।" तेव्हा बादशाह स्पष्टीकरण करत म्हणाले," भोसले और जाधव हमारे तक्त के ओर बढ़ रहे है, ऐसा लगता है। "
" नहीं हुजूर वो फर्मान सुनने के आदि है, पुश्ते गुलामी और
चाकरी के वजह से बाते उनके सोच में आएगी भी नहीं और
दोनो तक्त के लिए इतने वफादार है की, दोनो साथ आ जाए
तो आदिलशाह से ही मोगलो से लड़ जाए । वो दोनों हमारे
आगे लढने वाले सिर्फ प्यादे है, इसलिए तक्त की चिंता आप
न करे ।"
जगदेव राव , दादासाहेब आल्या नंतर ही गोष्ट त्यांच्या कानावर घालतोच." विठोजी राजे म्हणाले. तश्या उमाबाई
म्हणाल्या की, आमच्या कडून पाहुणचार करण्यात काही
चूक झाली असेल तर मनात काही धरू नका." त्यावेळी
उमाजी निमूटपणे मान खाली घालून उभा असतो. त्यांना
उद्देशून उमाबाई पुढे म्हणाल्या की, काय उमाजी !" तशी
उमाजी ने आपली मान पटकन वर केली नि त्यांच्या कडे पाहत म्हणाला की, काही नाही." तसा जगदेव म्हणाला की ,नाही नाही कशातच काही कमी केले नाही." इतक्यात त्यांना कालचा प्रसंग आठवला. संभाजी राजे म्हणाले होते की मघापासून बुड टेकून बसला होता नि आम्हाला पाठविले हिराजी कडे." तेव्हा
उमाजी ने बोलण्याचा प्रयत्न केला की त्याचं काय झालं ...?तेव्हा संभाजी राजे त्यांना पुढे बोलू न देता म्हणाले," अहो, आपल्या मर्यादित राहून बोला. हे जसे आठवले तसे ते पटकन म्हणाले," पण...?" इतकेच बोलून थांबले. म्हणून विठोजी राजे आणि उमाबाई नि न कळून त्यांनी प्रश्न केला की , पण काय ?" परंतु त्यांच्या प्रश्नांचे उत्तर न देता जगदेव राव एकदम विषय बदलून म्हणाले की, पण म्हणजे, आम्हीच जास्त दिवस तुमच्या कडे राहू शकलो नाही." असे म्हणून तेथून निघाले.
बादशहा बुध्दीबळ खेळत असताना म्हणाला की, वजीरे
आलम आप की हुई बाते भूल जाते है ।" मालिक अंबर ने
पूछा की, " वो कैसे ?" तेव्हा बादशहा म्हणाला की , " अभी कुछ देर पहले आपने कहा की अगर यह प्यादा सीधा यहां पहुंच जाए तो मल्लिका बन जाता है । तो क्या वो प्यादे मल्लिका बन नहीं सकते ?" वजीरे आलंम मलिक अंबर उद्गारला ," अवश्य मल्लिका तो बन सकते है, मगर बादशाह नहीं." बादशहा
उद्गारला ," यह बिल्कुल दुरुस्त बात की आपने, इसलिए हम आपकी बात मानते है और उन दोनों की रिशेदारी होने की रजामंदी हम आपको देते है । लेकिन सारी जिम्मेदारी आपको उठानी पड़ेगी।"
" लेकिन एक अर्ज है आपके पास ."
" वो क्या ?"
" जरूरत पड़ी तो आपको एक फर्मान देना पड़ेगा ।"
" तक्त महसूस रखने के लिए हम आपको फर्मान भी देंगे ।"

Comments
Post a Comment