Chhatrapati Shivaji Maharaj | छत्रपती शिवाजी महाराज | भाग 6 | Mahendranath Prabhu

Chhatrapati Shivaji Maharaj | छत्रपती शिवाजी महाराज | भाग 6  | Mahendranath Prabhu

Chhatrapati Shivaji Maharaj |

 छत्रपती शिवाजी महाराज | भाग 6 |

 Mahendranath Prabhu






  " लेकिन एक अर्ज है आपके पास ."
   " वो क्या ?"
   " जरूरत पड़ी तो आपको एक फरमान देना पड़ेगा ।"
   " तक्त महसूस रखने के लिए हम आपको फरमान भी देंगे ।"



पुढे. 


   मालोजी राजे आपल्या गढी आल्यावर सर्वांना धारेवर धरले.

कुणाला ही त्यांच्या रागवण्याचे कारण कळेना,कारण त्यांचे

म्हणणे होते विठोजीनीं अष्टदिशाना एक एक हजार सैन्य ठेवावे.

पण कसं शक्य होते, कारण त्यांच्या पाशी तीन हजारच सैन्य

होतं. पण हे सत्य बोलण्याची त्यांच्या समोर कुणी हिंम्मत करेना

मात्र शहाजी राजे गप्प बसले नाहीत. ते म्हणाले की, आबासाहेब आपल्या कडे फक्त तीन हजार सैन्य उपलब्ध असताना अष्टदिशांना एक हजारी सैन्य पाठविणे कसं शक्य आहे. तेव्हा मालोजी राजे आपल्या बंधू पाशी येऊन म्हणाले की, पाच हजारी मनसबदार असल्यावर तर शक्य आहे की नाही ? " विठोजी राजे फार गोंधळून गेले.पांच हजारी मनसबदारी काय बोलता काय आपण दादासाहेब ?" तेव्हा मालोजी राजे खुलासा करत म्हणाले," बादशहा हजरत ने आपल्या दोघांचा पराक्रम पाहून दोघांनाही पाच पाच हजारी मनसबदारी दिली आहे. हे ऐकून सर्वांनाच आनंद झाला. संभाजी राजे ने आपल्या धाकटा बंधू मुंबाजीला आदेश दिला की जा नि आऊ साहेबांना बोलून आणा. तर दुसरी कडे शहाजी राजे दौलाती ला म्हणाले की, नौबत वाजवा. म्हणजे सर्वांना कळू दे. म्हणजे एकदरीत सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरले.


  मलिक अंबरचा पुत्र मात्र आपल्या बापावर नाराज असतो.

बापाच्या दालनात येऊन त्याने आपल्या बापा समोर आपली 

नाराजी दर्शविली. म्हणाला की, आपके पास गैर लोगोंके

बारे में सोचने के लिए समय सिर्फ अपने बेटे के बारे में सोचने

के लिए समय नहीं." 

   " कहना क्या चाहते हो ?"

   " यही की किसीको जहागिरी देना, शादी रचना आपको

अच्छी तरह आता है, और बादशाह हजरत भी उसमे दिलचस्पी

ले रहे है।"

   " यह सब रियासत की बाते है, तुम्हारी समझ में नहीं आएगी

तुम सिर्फ अपने बारे में कहो ।"

    " तो ठीक है, सुनिए , आप हमारे निकाह के बारे में नहीं

सोच रहे है, और जहागिर के बारे में नहीं सोच रहे है ।"

   " देखो पहले हम तुम्हारे शादी के बारे में सोच रहे है।"

   " तो क्या सोचा है आपने,मतलब की कौनसी उमरवां जान

के बारे में सोचा है ?"

   " हम उमराव जान के बारे में क्यों सोचेंगे ?सोचेंगे तो किसी

मुगल सल्तनत के शहदादी के बारे में या आदिलशाह सल्तनत

के किसी शहदादी के बारे में सोचेंगे । "

   " क्या कह रहे आप क्या सच में ऐसा हो सकता है?"

   "क्यों नहीं हो सकता हौसला बुलंद होना चाहिए और रही बात जहागीर की तो सुनो तुम्हारे वालिद वजीरे आलम है, तो 

तुमारी नजर जहागीर पर नहीं तक्त पर होनी चाहिए ।"

   " अब्बु आप हमारे लिए अच्छा सोच रहे है ।"

   " तो अब क्या करोगे ?"

   " बस यही सपना देखा करूंगा ।" असे बोलून त्याने आपल्या

पित्याचा हात पकडुन चुंबला आणि तेथून निघून गेला.

  



   मालोजी राजे इतके खुश होते की वजीर आलम मलिक

अंबरची प्रशंसा करत असताना त्यांनी शहाजीच्या सोयरिकी

बद्दल पटकन बोलून गेले. तशी उमाबाई ना पण आठवण झाली

की आपण ही सिंदखेड वरून आलेल्या प्रस्ताव बद्दल सांगायचं

राहूनच गेलं. तशा त्या ओशाळून म्हणल्या की, आम्ही सुध्दा

किती वेंधळया आहोत. तुम्ही तिकडे गेलात नि इकडे सिंदखेडहून  सोयरीकीचा पस्ताव आला. म्हणजे बघा ना, तिकडे तुम्हाला दीड हजारी वरून एकदम पाच हजारी मनसबदारी देण्यात आली नि इकडे सोयरीकीचा प्रस्ताव आला. याचा अर्थ शंभू महादेवाच्या मनात ही तसे आहे." त्यावर मालोजी राजे उद्गारले," आमच्या कडून ही एक सांगायचं र्

राहून गेले की...."

   " ते काय ?"

   " शेख बाबा नी पण कौल दिला आहे, आता बघा जाधव

रावा ना शोभेल असाच आम्ही बंदोबस्त करू.  काय ?"

उमाबाई शहाजी राजेंना उद्देशून बोलल्या की, आम्ही तुमच्या

लग्ना विषयी बोलत आहोत असे बावरून जाऊ नका."

शहाजी राजे मात्र विचारमग्न झालेले दिसतात. ते पाहून मालोजी

राजे म्हणाले," त्यांच्या ध्यानात अजून आलेले दिसत नाहीये."

  उमाबाई उद्गारल्या," अहो शहाजी राजे, तुम्ही फार मोठे 

भाग्यवान आहात. म्हणजे लग्नापूर्वी तुम्ही त्यांना पाहिले देखील

आहे." पण तरी देखील शहाजी राजे गप्पच होते. काय विचारत

करत होते ते कोण जाणे ? तेव्हा मालोजी राजे हसून म्हणाले,

  " अजून कळलेले नाहीये असे वाटतं.....अहो, शहाजी राजे

लखुजी राजे यांची कन्या जिजाबाई शी तुमचं लग्न होणार आहे." असे म्हटल्यावर मात्र शहाजी राजेंच्या नजरे समोर 

तो प्रसंग उभा राहिला. जिजाबाई त्यांना म्हणाल्या होत्या की

जनाब की आदब और फरमादारी देखकर हमे यकीन हुआ

था की आप वेरुल के भोसले ही होंगे ।" तेव्हा मालोजी राजे

म्हणाले की उद्या आपला मुक्काम इंदापूरला हलवायचा

आहे."

  " अगंबाई मग ?"

  " मग काय जायलाच हवं आहे. कसे आहे, अगोदर आपली

जहागीर सांभाळायची मग सर्वकाही येतय का ध्यानात ? शहाजीच्या लग्ना विषयी आपण अजिबात चिंता करू नका. ते

योग्य वेळी होईलच.?" त्यावर कोणीच काही बोलले नाही.


   जिजाऊंना ही वेरुळच्या भोसले यांच्या सोबत आपली

सोयरिक जुळली आहे, इतकंच माहित आहे, परंतु नेमके 

कोणाशी हे माहीत नाही. कारण एकूण दहा भाऊ आहेत त्या पैकी कोणाशी लग्न जुळले आहे, हे माहीत नाही. त्यांच्या आऊ साहेबांचे म्हणणे आहे की आपल्याला तरी इतकं माहित आहे, आम्हाला तर लग्न होईर्यंत माहित पडले नाही की आपले लग्न कुणाशी होणार आहे ते. जिजाऊ इथं स्वतःच्या लग्ना विषयी विचार करत असतात. नेमके त्याच वेळी वेरुळला देखील शहाजी राजे सुध्दा बहुधा स्वतःच्या लग्ना विषयी विचार करत असावेत. म्हणूनच संभाजी राजे इतके मोठ्याने ओरडुन देखील त्यांना ऐकायला येत नाही. शेवटी संभाजी राजे त्यांच्या जवळ येऊन त्यांना हलवत म्हणाले," अहो, राजे आपण कसला विचार करत आहात, नाही म्हणजे आम्ही इतके बोंबलतोय पण आपले

काही लक्ष नाही आमच्या कडे , म्हणून म्हटले की विचारून पाहू !"

   " दादासाहेब आपण आम्हाला हांक मारली नि आम्ही

आपल्या हाकेला ओ दिला नाही, त्या बद्दल क्षमा असावी.

खरं सांगायचं तर आम्ही थोडा विचार करत होतो."

   " सोयरीकीचा ना ?"

   " हां पण हे तुम्हाला कसं कळलं ?"

   "  अगदी सोपं आहे, तुम्ही दुसरा कोणता विचार करायला

एवढा वेळ लावणारच नाही. बरं ते जाऊ दे. मी काय म्हणतो की

आम्ही थोरले आहोत ना, आम्ही तुमची पाठराखण अवश्य करू ."

   " पाठराखण म्हणजे काय दादासाहेब?"

   " म्हणजे कसं आहे, आता तुमचं लग्न होणार म्हणजे तुमच्या

सुखा दुःखाच्या  त्या अर्ध्या भागीदारीनी असणार, तुम्हाला

एकट्याला काहीच असं मिळणार नाही. प्रत्येक गोष्ट त्यांना

सांगूनच नंतर करावी लागणार, म्हणजे तुमचं स्वातंत्र्य संपलेच 

असे समजा की !"

   " अरे बापरे ! म्हणजे आपल्याला काहीच अधिकार नाही."

   " अधिकार आहे ना, म्हणजे आपण फक्त घोड्याशीच बोलायचं."

   " घोड्याशीच ?"

   " हो आपल्या सोबत सतत कोण असणार घोडेच ना ?"

त्यावर शहाजी काहीच बोलले नाहीत. पण विचारमग्न अवश्य

झाले.


    लखुजी राजे आले. त्यांना सुखरूप आलेले पाहून त्यांच्या

तिन्ही पत्नी ना अत्यानंद झाला. इतक्यात तेथे त्यांच्या जाऊ

बाई आल्या तेव्हा थोरल्या बाई साहेब म्हणाल्या," आता तरी

तुमच्या मनातील भीती गेली का ? "

   " म्हणजे ?"

   " त्यांना सतत अपशकुन होत होते. म्हणून म्हटलं की अगोदर

रेणुका मातेला नमस्कार करा, नि आपले जे काय मागणं आहे

ते रेणुका मातेला सांगा." असे म्हाळसा बाई उद्गारल्या.

त्यावर लखुजी जाधवांनी सांगितले की आपल्याला देखील या

लग्ना सबंधी विचार करावा लागेल." त्यावर म्हाळसा बाईंनी

प्रश्न केला की, असं का बरं म्हणाले ?" त्यावर लखुजी राजेंनी

सांगितले की दोन्ही वजीर ह्या सोयरीकी बद्दल बोलत आहेत.

मीआन राजू चे म्हणणे आहे की वेरुळ कराना पाच पाच हजारी

मनसबदारी मिळाली तरी ते तुमची बरोबरी करू शकत नाही.

कारण तुम्हाला मिळालेली मनसबदारी फार कष्टाने मिळाली

आहे. त्याची तुलना कशात होईल का ?" तेवढ्यात मधल्या बाई म्हणाल्या ," पण मी म्हणते तुलना करायचीच कशाला ?" त्यावर थोरल्या बाई म्हणाल्या," तुमचं म्हणणे बरोबर आहे, परंतु त्यांना पुरते बोलू तर द्या. पण मलिक अंबर तर विचार करा असे म्हणाला होता ना ? "

   " हो ; तो आज ही तेच म्हणाला. विचार केला का ? तर मी

म्हणालो नाही अजून. तर तो मला म्हणाला की ज्यादा सोचोगे

तो जज्बात बहखने लगते हैं, और खयालात बिखर जाते है हम तो ऐसी बाते अहसास से ही   तय कर लेते है । याचा अर्थ काय ?"

   " पण मी म्हणते त्यांचा इथं सबंध काय ?"

   " तेच तर मला कळेनासे झालंय म्हणून मी ठरवलं आहे."

   " काय ठरवलं आहे ?"

   " हेच की आपण फक्त  वेरुळला प्रस्ताव पाठवला आहे, वाटाघाटी अजून सुरू झाल्या नाहीत म्हणून आपण आपला विचार अजूनही बदलू पण शकतो."

   " पण का ?"

   " का म्हणजे ?  मोठ्यांच्या राजकारणात आपल्या जींजाची

परवड होईल त्याचं काय ? म्हणून जगदेव राव येईर्यंत आपण

वाट पाहू या. तिकडून काय उत्तर घेऊन येतो ते पाहू आणि 

त्यानंतर पुढचा निर्णय घेऊ. काय ?" पण त्यांच्या तिन्ही बायका

ह्या गोष्टीस सहमत होत नाहीत. म्हणून थोरल्या बाई जीजाची

कुंडली शास्त्री बुवांना दाखवतात. शास्त्री बुवा कुंडली पाहून

सांगतात की खूप छान ; परंतु ?" बोलता बोलता मध्येच ते 

बोलायचे थांबले. म्हणून थोरल्या बाईना वाटले की काहीतरी

अमंगल आहे म्हणून त्यांनी विचारले की शास्त्री बुवा आपण

बोलायचं का थांबले ? कुंडली मध्ये काही अनिष्ट आहे का ?"

  " नाही नाही अनिष्ट असं काही नाही फक्त मधला काळ थोडासा कष्टांचां नि जिग्रीचा आहे फक्त इतकंच. पण तुम्ही चिंता करू नका . त्यांच्या कडून असं काही महान कार्य घडणार आहे की त्याची तुलना कशा मध्येही होणार नाही. पिढ्यानपिढ्या त्यांची कीर्ती जतन करून ठेवावी लागेल असेच महान कार्य घडणार आहे त्यांच्या कडून. तेव्हा त्याची चिंता करायची सोडाच." पण तरी देखील त्यांच्या मनात शंका आलीच म्हणून शंकेचे निरसन करण्याच्या हेतूने त्या म्हणाल्या की, आपण हे आमची समजूत पटावी म्हणून तर सांगत नाही ना ?" त्यावर ते म्हणाले," नाही नाही आम्ही आपल्याला जे काही सांगितले त्यातला शब्द न शब्द खरा आहे." असे बोलून पत्रिका गुंडाळून त्यांच्या हातात दिल्या. म्हाळसा बाई जायला वळल्या तसे ते  पंत

म्हणाले," राणी सरकार सोयरिक जुळवीली आहे का कुठं ?"

" अजून काही नक्की नाही. पण वेरुळच्या भोसल्या कडे

प्रस्ताव पाठविला आहे." नाव ऐकून  त्यांच्या चेहऱ्यावर गंभीर तेच्या छटा उमटल्या पण काहीच बोलले नाहीत.


     मालोजी राजेंना विठोजी राजे इंदापूरच्या सर्व ठिकाणची

माहिती देत असतात. तेव्हा मालोजी राजे आपली रणनीती

कशी असावी त्या बद्दल संपूर्ण माहिती देतात. शिवाय शत्रूशी

सामोरा समोर युद्ध करायचं नाही. कारण आपल्या कडे सैन्य बळ कमी आहे, अश्या परिस्थतीत कमीत कमी सैन्याने शत्रूचा पाडाव कसा करता येईल त्या बद्दल ही माहिती सांगतात. तसेच निसर्गाचा ही आपणाला कसा उपयोग करून घेता येईल. तेही सांगतात. जसे की शत्रू रात्रीचा हल्ला करू शकतो. म्हणून सदैव सावध राहायला हवं. तसेच खिंडी किती आहेत असे मालोजी राजे विचारतात तेव्हा विठोजी राजे सांगतात की खिंड तर एकच आहे, विजापूर तिकडून येण्याची शक्यता आहे. तेव्हा मालोजी राजे म्हणाले की, आपण त्यांना खिंडीतच गाठू आणि त्यांचा खिंडीतच खात्मा करू !" असे सांगून ते पुढे म्हणाले की, चला

आपले पाय मोकळे करून येऊ." असे बोलून दोन्ही बंधू जातात. तेव्हा संभाजी राजे नि शहाजी राजे मात्र अजूनही 

तिथंच उभे असतात. तेव्हा संभाजी राजे ने विचारले की, राजे

तुम्ही काही बोलले नाही ते." त्यावर शहाजी राजे म्हणाले,

  " नाही. आबासाहेब जे सांगत होते ते नीट कान देवून ऐकत

होतो नि विचार करू लागलो की आपल्याला हे जमेल का ?"

  " का नाही येणार, आपले भोसल्यांचे रक्त आहे, माघार

थोडीच घेणार , आपण निश्चितच करून दाखवू. त्या बद्दल 

मनात किंतू परंतु ठेवू नये." त्यावर शहाजी राजेंनी स्मित हास्य

केले.


     म्हाळसा बाईंनी आनंदाची बातमी देताना म्हणाल्या की, 

आपल्याला माहीत आहे, जिजांच्या पत्रिके बद्दल सांगताना

त्या म्हणाल्या की, जिंजाच्या हातून  असे काही मन कार्य

होणार आहे की त्याची कीर्ती सर्वत्र पसरेल.इतकंच नाही तर

पिढ्यानपिढ्या जतन करून  ठेवण्यासारखे आहे." त्यावर

लखुजी राजेंनी विचारले," पण शास्त्री बुवा असं तर म्हणाले नाहीत ना की,जिजांची सोयरिक भोसल्याशी केली तरच 

त्यांच्या भाग्यात तसे आहे.? "

   " नाही. असं काही ते म्हणाले नाहीत."

   " मग  झालं तर !"

   " म्हणजे ?"

   " म्हणजे असं की दुसऱ्या कोणा बरोबर सोयरिक केली

तरी त्यांच्या भाग्यात तसेच होईल. होय ना ?"

   " हां पण प्रस्ताव आपणच पाठविला होता ना ?"

   " हो पण जगदेव रावांना येऊदे की मग कळेच काय ते."

इतक्यात जगदेव रावांचा मागून आला की दादासाहेब आम्ही

आंत यायचे का ?"तसे लखुजी जाधव उद्गारले," ते पहा

जगदेव राव आले. आता त्यांनाच काय ते सांगू दे." तेव्हा जगदेव राव त्यांना सविस्तर माहिती देतात की इकडून निघाल्यावर रस्त्यामध्ये कोण आडवे आले ? त्यानंतर चार हबशीनी आपला रस्ता कसा अडविला. इतकंच नाहीतर त्यांनी आपल्यावर कसा हल्ला केला  तेही सांगितले." ते ऐकून म्हाळसाबाई उद्गारल्या," याचा अर्थ आमच्या जाऊ बाईना जे अपशकुन होत होते ते खरेच होते तर !"

  " ते कारस्थान कासिम खानचेच असणार , कारण तुम्ही

प्रकारे तुम्ही दोघे थांबत नाही म्हंटल्यावर त्याने हा दुसरा मार्ग पत्करला असावा."

   " पण का ?" म्हाळसाबाईंनी विचारले.

   " कासिम खान मीआण राजुचा माणूस आहे, आणि मीआण

ला ही सोयरिक होऊ नये असेच वाटते." लखुजी जाधव

   "  असे असेल तर आपल्या गढीतच कोणीतरी नासका

अंबा आहे, पूर्ण अडी खराब होण्या अगोदर त्याला हुडकून 

काढायला पाहिजे."

   " बरं वेरुळ ला काय झाले ते सांगा." लखुजी जाधव म्हणाले.

तसे जगदेव राव पुढे सांगू लागले , वेरुळला गेल्यावर उमाबाई नि आपले कसे स्वागत केले तेही सांगितले. सोयरिकी बोलणी मात्र झाली नाहीत. कारण मालोजी राजे अहमदनगरला गेले होते. ते आल्यानंतरच सोयरिकीची बोलणी होतील. असे उमाबाई

आणि विठोजी राजेंनी सांगितले. तेव्हा लखुजी जाधव उमाबाई

ना म्हणाले की, जगदेव राव म्हणातात ते खरंय नाहीतर मला

सांगा जगदेव राव वेरुळ ला जाणार आहेत नि आम्ही अहमद

नगर ला जाणार आहोत हे बाहेरून कसे कळेल.गढीतीलच

कुणीतरी शत्रूस फितूर आहे, तेव्हा गढी मध्ये  येणाऱ्या जाणाऱ्या लोकावर जरा बारकाईने लक्ष ठेवा. कोणीतरी इकडच्या खबरी तिकडे म्हणजेच मीआण राजू पर्यंत पोहोचत आहे. त्याला शोधून काढायलाच पाहिजे. आणि सोयरिकीचा विषय तूर्तास बाजूला ठेवा.हेच उत्तम."


      बादशहा हजरत जवळ सर्वजण आपापली मते मांडत असतात. विजापूरहून आदिलशहाची फोज इंदापूरवर चाल

करून येत आहे, ही खबर बादशहा हजरतला समजली

आहे, म्हणून त्यांनी विचारले की इंदापूरची जहागिरी किसके

पास है ?" तभी वजीर आलम  मलिक अंबर म्हणाला ," मालोजी भोसले के पास है . " मीआण राजू उद्गारला की 

अभी अभी बादशहा हजरत ने पाच हजारी मनसबदारी दी हैं.

तसा लगेच श्रीपती म्हणाला," कुठं वेरुळ नि कुठं इंदापूर कसं शक्य आहे ?" तेव्हा वजीर आलम मलिक अंबर म्हणाला,

   " मालोजी राजे इंदापूर के लिए रवाना भी हुए ।"

   " हमे इस जंग में सिर्फ फतेह चाहिए इसलिए दोनो वजीरे

को चाहिए की अपनी अपनी ताकद लगाकर अपनी होनहार 

फौज को भेजे ।" 

  " हुजूर का हुकुम सर आंखों पर लेकिन वजीरे आलम 

मालिक अंबर जी हमे यकीन है कि आप आगे भी यह बात याद रखेंगे ।" मीआण राजू मुद्दाम बादशहा समोर बोलला. परंतु

मलिक अंबर सुध्दा काही कमी नव्हता. त्यांचे सुध्दा जशास तसे

उत्तर दिले , " हुजूर, निजामशाही के तक्त के लिए मालिक अंबर खुदासे भी लढ सकता है और यही उम्मीद हम औरोंसे भी रखते है।" असे म्हटल्या नंतर श्रीपती हळूच खालची मान किंचित

वर करून बोलला की ," हम बादशाह के लिए अपनी जान 

जोखीम में डाल  देंगे ।" तसा मालिक अंबर च्या गटा मधून 

ही आवाज उठले की ,  "  हम भी बादशाह का परछम बुलंद 

रहे । " तसा बादशहा हजरत खुश होऊन म्हणाला, " सुबानल्ला हम यही उम्मीद रखते है, फौज  भेजने का फरमान इसरार 

हो ।" बादशहा हजरतला ही चांगले ठाऊक आहे की आपल्या

दोन्ही वजीरांचे आपसात पटत नाहीये. ते एकमेकांचा सतत 

पाडाव करायचा प्रयत्न करत असतात. परंतु हे दोघेही वजीर

आपसात असेच भांडत राहिले तरच आपला तक्त साबुत राहील. कारण त्याच्या तक्त ला मराठ्या पासून धोका नाहीये. तर ह्या दोघां पासूनच धोका शबवू शकतो. हेही त्याला चांगले ठावूक आहे.


    मालोजी राजे थाळ्या वर बसतात. तेवढ्यात विठोजी राजे

येतात नि  शत्रू गड चढून आल्याची सूचना देतात. तेव्हा मालोजी

राजे त्यांच्या वर रागवत म्हणाले की मी सकाळीच सांगितले

होते, शत्रू खिंडी चढून येण्या अगोदर आम्हाला सूचना द्या म्हणून." त्यावर विठोजी राजे म्हणाले," आम्हाला देखील आताच सूचना मिळाली." पण आपले बंधू राज थाळ्या वर

बसलेले आहेत हे पाहून विठोजी राजे पुढे म्हणाले," पण हरकत नाही, दादासाहेब  आम्ही जातीने जातो तिकडे. तुम्ही जेवण

करून घ्या." त्यावर मालोजी म्हणाले," नाही. तुम्हाला जे सांगितले आहे, तेच करा. आम्ही जातो महादेव खिंडी कडे."

तेव्हा मालोजी राजे थाळ्या वरून उठतात. तेव्हा उमाबाई त्यांना विनंती करतात की असे थाळ्या वरून उठायचं नसतं. तेव्हा मालोजी राजे त्यांच्या वर रागवत म्हणाले," शत्रू खिंडी उतरून आला उमाबाई शत्रू अजून पुढे आला तर रयत मधील कुटुंब थाळ्या वरूनच नाहीत तर पूर्ण जीवनातून उठतील. मालोजी राजे तुम्ही निघाच आम्ही पण निघतोच असे म्हणून ते लगेचच निघाले. उमाबाई त्यांच्या पाठमोरी आकृती कडे नुसत्या पाहतच राहिल्या. त्यानंतर त्या खाली बसल्या नि हात जोडून म्हणाल्या," अन्नपूर्णे रुसू नकोस नि रागवू पण नकोस. रयत ची भाकर कोणी त्यांच्या कडून हीचकावून घेऊ नये, म्हणून स्वारी ना जावे लागले."


क्रमशः




 

Comments

Popular posts from this blog

Chhatrapati Shivaji Maharaj | छत्रपती शिवाजी महाराज | भाग 1 | Mahendranath Prabhu

Chhatrapati Shivaji Maharaj | छत्रपती शिवाजी महाराज | भाग 4 | Mahendranath Prabhu