Chhatrapati Shivaji Maharaj | छत्रपती शिवाजी महाराज | भाग 1 | Mahendranath Prabhu

Chhatrapati Shivaji Maharaj | छत्रपती शिवाजी महाराज | भाग 1 | Mahendranath Prabhu

Chhatrapati Shivaji Maharaj |

 छत्रपती शिवाजी महाराज | भाग 1 |

 Mahendranath Prabhu




    शिवाजी महाराजांच्या पूर्वजांच्या विषयी थोडेसे जाणून घेऊ


     शिवाजी महाराजांचा जन्म भोसले घराण्यात झाला हे तर सर्वांनाच माहित आहे. परंतु या राजघराण्याचा मुळपुरूष सुजनसिंह  हा उदयपुरच्या शिसोदे राजघराण्यातील असून तो इ.स.१३३४ च्या सुमारास आपले भाग्य अजमविण्यासाठी  उत्तरे कडून दक्षिणेत उतरला. व बहामनी घराण्याचा मूळ पुरूष हसनगंगु यांच्या पदरी त्याने चाकरी पत्करली. हसनगंगुचा पाडाव करण्यासाठी बादशहा महमद तुघलक याने दिल्लीहून इ.स. १३४६ मध्ये दक्षिणेत स्वारी केली. त्या दोघांमध्ये झालेल्या संग्रामात सुजनसिंह व त्याचा मुलगा दिलीपसिंह यांनी मोठा
पराक्रम केला. इ. स.१३४७ मध्ये हसनगंगू ने अल्लाउद्दीन
बहमन हे नाव धारण करून गुलबर्गा बहामनी राज्याची स्थापना केली. तेव्हा त्यांनी सुजनसिहांस देवगिरी प्रांतातील १० गावे जहागिरी देवून मोठी सरदारी दिली. पुढे बहामनी राज्यात
सुजनसिंह कुटुंबाचां उत्कर्ष होत गेला. सुजनसिंह इ. स.१३५५
मध्ये मरण पावला. त्याचा पुत्र दीलीपसिंह  कुटुंबाचां प्रमुख
बनला. दिलीप सिंहाचा पुत्र सिध्दजी हा कर्तबगार होता. त्याने
बहामनी सत्तेच्या रक्षणार्थ आपला  प्राण खर्ची घातला.त्याचा
पुत्र भैरवसिंह उर्फ भोसाजी वशंज ते भोसले राणाकर्णसिंह
आणि शुभकृष्णसिंह भोसाजीचे पणतू  होत.
   
   सन १४६९ साली बहामनी वजीर मंहमद गवान याने दक्षिण
कोकण जिंकण्यासाठी लष्करी मोहीम हाती घेतली. कर्णसिंह
आपल्या भीमसिंह या पुत्रासह या मोहिमेत सहभागी झाला
होता. कोकणात उतरत असताना मार्गात खेळणा उर्फ विशाळगड हा किल्ला लागला. तो घेण्यासाठी बहामनी फौजा
प्रयत्नांची शर्त करू लागल्या. पण सह्याद्री पर्वताच्या बिकट
रांगेतील हा दुर्गम किल्ला सहजासहजी हल्ला करून जिंकता
येण्यासारखा नव्हता. बहामनी फोजेचे सर्व प्रयत्न संपल्यावर
कर्णसिंह आणि भिमसिंह या पितापुत्रांनी एक अभिनव युक्ती
लढविली त्यांनी घोरपडीच्या साहाय्याने  कडा चढून किल्ला
हस्तगत केला. किल्ला वरील लढाईत राणाकर्णसिंह धारातीर्थी
पडला. पण त्याच्या प्रयत्नाने कोकणातले प्रवेशद्वार असलेला
खेळणा किल्ला जिंकला गेला. म्हणून बहामनी सुलतानाने
कर्णसिंह आणि भिमसिंह यांचा गौरव करून भिमासिंहास
" राजा घोरपडे बहाद्दर " हा किताब व मुधोळ आणि त्यांच्या
जवळची ८४ गावे जहागीर म्हणून देण्यात आली.

    सन १४६९ च्या वेळे पासून भोसले वंश शाखेस घोरपडे हे नाव प्राप्त झालं मुसलमानांची सत्ता महाराष्ट्रात स्थिर झाल्यानंतर खिलजी, तुघलक, बहामनी, यांच्या कारकिर्दीत हजारो मुसलमान दक्षिणेत आले. त्यात सुफी कलंदर, पीर,फकीर होते. राजा श्रयाच्या जोरावर सुफी नी ठिकठिकाणी मठ,दर्ग, मशिदी यांची स्थापना केली. त्या काळात दाभोळ, चोचला, उतरणान्या प्रत्येक जहाजाबरोबर इराकी, इराणी, अरब आणि हबशी, मुत्सद्दी आणि औलिया दक्षिणेत उतरत. दिल्लीहून अशीच वर्दळ दक्षिणेत चालू होती. बहामनी सुलतानांनी इराण ( पशिया ), तुर्कस्थान, मध्य आशिया, अरबस्तान,आणि अफगाणिस्तानातील मुसलमानांना आपल्या नोकरीत ठेवले
होते.परिणामी दख्खनी व परदेशी यांच्यात सत्ता संघर्ष सुरू
झाला. शिवाय बहुतेक दख्खनी सुन्नी पंथाचे असून बहुतेक
परदेशी पंथीय होते.

      बहामनी राज्याचा एक गाजलेला प्रधानमंत्री मंहमद गवांन हा इराणी होता. त्याचा ही खून या संघर्षात पडला. बहामनी काळात अधिकाराच्या जागेवर एक ही हिंदू चे नाव आढलत नाही. असे फारशीच विद्वान इतिहास संशोधक सेतू माधव पगडी सांगतात. ह्या काळात राज्यकर्त्या मुस्लिम समाजा कडून हिंदूचा छळ होत होता. याचे मोठे भेदक चित्र शिवचरित्र साहित्यात प्रसिद्ध झालेल्या लेखात सापडते.ते राजवाड्यांनी रेखाटले आहे. ते लिहितात की, हिंदू बाटवले गेले,देवळे मोडली गेली, देव फोडले गेले, बायका भ्रष्ट केल्या गेल्या, साधुसंत छळले गेले, देवळाच्या मशिदी झाल्या, पर्वतांचे पीर झाले, घाटाचे दर्गे बनले, राऊळाचे महाल झाले, धर्म केवळ लोपून गेला. अशी हैराण गत झाली " परकी राजसत्तेचा दुसरा परिणाम म्हणजे राजकर्त्यांची दख्खनची हिंदी भाषा, पेहराव, चांलरीती, यांचा उर्दू फारसी लोकां वरील पगडा होय. इजार , चढाव, दाढी, गोवापाडा आणि बोली यांचा अधिकाधिक शिरकाव , हिंदूच्या दैंनदिन राहणीत होत गेला. बहामनी काळात सुफी साधूंनी नाथपंथाला निष्प्रभ केले. पुढील मुस्लिम काळात महानुपंताची वाताहत झाली. नामदेवाच्या पश्चात वारकरी पंथाला ही उतरती कळा लागली.

       चौदाव्या शतकात ज्ञानेश्वर , जनार्दन स्वामी, एकनाथ, दासोपंत इत्यादींच्या कामगिरीने महाराष्ट्राच्या भ्रांत मनाला स्थिरता प्राप्त झाली. पंधराव्या शतकात गुरुचरित्र, सोळाव्या शतकात एकनाथी भागवत आणि भावार्थ रामायण हे ग्रंथ महत्व पावले. कोकणपट्टी तील पोर्तुगिजांच्या उच्छादामुळे नवीन संकटाची भर पडली. तरीही शाह्याच्या आपापसातील लढाया, त्यांच्या दरबारी दक्षिणी परदेशी शिया व सुन्नी या भेदानी सत्ता स्पर्धेत भर घातली. त्यामुळे मराठा सरदारांना व मुत्सद्याना डोके वर काढण्यास चांगली संधी मिळाली. मोरे,मोहिते, घोरपडे, घाटगे, जाधव , भोसले अशी अनेक मराठी घराणे पुढे आली. शहा उदय पावल्या त्या अश्या,

१)विदर्भाची इमादशाही  (१४८४ ते १५७४ ) संस्थापक फत्ते उल्ला इमादशाहा, विदर्भ या बहामनी राज्यातून फुटून आपले स्वातंत्र्य घोषित करणारा पहिला प्रदेश होय. इमादशहा हा मूळचा कर्नाटकामधील ब्राम्हण असून त्याने इस्लाम धर्माची दीक्षा घेतली होती. सन  १५७४ मध्ये अहमदनगरच्या निजामशाही राज्य जिंकून विलीन केले.
२) विजापूरचा आदिलशहा १४९० ते १६३६ संस्थापक मलिक
अहमद, दख्खनी मुसलमान असून मूळचा हिंदू होता. त्याने
संरक्षण दृष्ट्या योग्य म्हणून जुन्नर हून अहमदनगर ( मूळ नाव
अंबा नगर ) येथे आपली राजधानी नेली.
३ ) गोवळकोंड्याची कुतुबशाही ( १५ १२ ते १६ ८७ ) संस्थापक कुली कुतुबशहा हा इराणी असून शिया पंथाचा
होता.
४ ) बिरादार ची बरिद शाही ( १५ २७ ते १६ १९ ) संस्थापक
अमीर अली बरीद हा जॉर्जियन  होता. सन १६ १९ मध्ये आदिलशहाने बिदर जिंकले. अहमदशहाचा मुलगा बून्हानशहा इ. स १५ ७८ मध्ये गादीवर बसला. त्याचा मुख्य प्रधान कंवरसेन हा ब्राम्हण गृहस्थ होता. त्यामुळे हिंदूंना शासकीय सेवेत येण्यास सुलभ झाले.शुभकृष्णाचे वंशज बाबाजी भोसले यांनी निजामशाही ची नोकरी पत्करली. त्यांस निजामशाही कडून परगणे, पांडे, पेडगावची जहागीर मिळाली होती.बाबाजीस मालोजी व विठोजी असे दोन पुत्र होते.

सदर माहिती डॉ.वी.गो.खोबरेकर यांच्या मराठा कालखंड
भाग १ मधून घेतली आहे.

मालजीराजे भोसले

      मालजीराजे हे बर्हान निजाम शाहीत दीड हजाराच्या सरजाम सांभाळून लढाया करीत होते. त्यांचा मृत्यू १५५३ साली झाला.अर्थात मालजीचा मुलगा बाबाजी राजे लहान असल्यामुळे बुर्हान याने तो जप्त केला. आणि  हुसेन निजाम गादीवर आला. आणि ह्या काळात बाबाजी राजे लहान असल्याने दोघांनिही समाचार घेतला नसावा.
( याचा अर्थ वडिलांची जगगिरी त्यांना  दिली नसावी.तिच
मनसबदारी लखुजी राजच्या मध्यस्थीने मालोजी राजे
आणि विठोजी राजे ह्यांना दीड हजार ची मनसबदारी मिळाली )

१५६५ नंतर मुर्तजा गादीवर आला आणि ह्याने १५८८ पर्यंत निजामशाही गाजविली, या काळात बाबाजी राजे लष्करी कारवायांत दिसत नाहीत तर आपल्या मुकदम्मा , देशमुख्या पाटीलक्या पाहतच गेल्या असावा. शेडगावकर बखरीत बाबाजी राजे मातोश्री जवळ घृणेश्वरी रहात असून ते लग्न झाल्यानंतर देऊळ गावच्या पाटीलकी व मौजे खानवाटे व कसबे जिंती भिमातीरी खरेदी केल्या होत्या. हे मालजीच्या १५४९ पत्रावरून स्पष्ट होते.बाबाजी राजे यांच्या दौलती बद्दल स्पष्ट उल्लेख नसला तरी चुलते खेलोजी राजे आणि वडील मालोजी राजे बाबाजी राजे भोसले यांचे सनद पत्रात तपशील येतो तो, खानदेशातील परगणे, बहाळ व भडगाव, वऱ्हाड  प्रांतातील परगणे, जलगाऊ येतील देशमुख्या व परगणे, कनरड प्रांत देशमुखी व कसबे वेरुळ परगणे मजकूर प्रांत दौलताबाद येथील वंशपरपरागत मोकांदमी असल्याचे सांगतात. पंत प्रतिदिनी बखरीत बाबाजी भोसले पाटील मौजे हिंगणी,
बे व देऊळ गाव वगैरे

   मालोजी भोसले

मालोजी हे नाव त्यांच्या आजोबांच्या नावावरून ठेवले असावे,
त्यांच्या आजोबांचे नाव मालती राजे भोसले असे होते.
    मालोजी राजे इ.स.१५७०- ७१ सुमारास जन्मले. मालोजी ची
पत्नी उमाबाई फलटनच्या निंबाळकरांची मुलगी . मालोजी
वयात आल्यावर त्यांनी लष्करी कवायतीचे शिक्षण वडिलांकडून
आणि सासऱ्याकडून घेतले. यावेळी निजाम मूर्तजा निजामशहा
राज्य करीत होता. त्याने मालोजीस आपल्या पदरी ठेवून शिलेदारी दिली . " राजा " ही पदवी पंच हजारी मनसबदार व सैन्याच्या खर्चासाठी पुणे, सुपे, चाकण, चौन्याशी व इंदापूरची
देशमुखी व कुटुंब ठेवण्यासाठी शिवनेरीचा किल्ला इ. स. १५९०
च्या सुमारास बहुमान पूर्वक दिला. विजापूर सरदार दिलेरखान याने निजामशहाच्या ताब्यातील किल्यावर चाल केली. त्या प्रसंगी मालोजीनी दिलेरखानाला मागे हटवून निजामशाहीचे रक्षण केले. मालोजी या पराक्रमाचा उल्लेख बृहहिश्वर शिला लेखात केलेला आहे.

     मालोजीराजे भोसले आणि उमाबाई भोसले यांच्या पोटी शहाजीराजे यांचा जन्म १५ मार्च १५९४ रोजी झाला.(शहाजींच्या जन्मतारखेबद्दल इतिहासकारांत मतभेद आहेत.) काहींच्या मते मालोजी भोसले यांची मुख्य राणी उमव्वा साठे यांची कन्या उमा ही असून तिच्या पोटी शहाजी व शरीफजी यांचा जन्म झाला. तर काहींच्या मते फलटणच्या वनगोजी निंबाळकर यांची कन्या दीपा ह्या शहाजी व शरीफजी माता होय. त्यांच्या जन्माच्या वेळी त्यांच्या मातोश्री उमाबाईंनी अहमदनगरजवळील शहाशरीफ पीराला (अहमदनगर जवळील मुकुंदनगर भागात तारकपूर बस स्टँडपाशी) नवस बोलल्यामुळे त्यांनी आपल्या दोन्ही मुलांची नावे शहाजी व शरीफजी अशी ठेवली.

    लखुजी जाधव

    विदर्भात सिंदखेड येथे त्यांचे वतन होते.सिंदखेड जाधवांचे घराणे ही मूळ देवगिरी यादव राजवटीतील सरदारांची शाखा
आहे. देवगिरी येथील यादव राज्याचा  अंत झाल्यानंतर यादवांची ही दैन्यावस्था झाली. उदरनिर्वाह करण्यासाठी सर्वत्र पसरले. मग.   त्यांचे सरदारी पुढे काही पिढ्या नंतर बुलढाणा जिल्हातील सिंदखेड येथे स्थायिक झाले. सिंदखेड जाधव घरण्यात लखुजी हा कर्तृत्वान आणि विख्यात पुरुष उदय पावला.यादवांचे राज्य नष्ट झाल्यावर लखुजी यादव यांनीच जाधव घरण्यातला ऊर्जितावस्था प्राप्त करून दिली. लखुजीच्या नावाने इतिहास प्रसिद्ध झाला आहे. १) राजे दत्तोजी राव २) राजे अचलोजी राव, ३ ) राजे राघोजी राव ४) राजे बहादुरजी व कन्या राजमाता राष्ट्रमाता, जिजाऊ आऊ साहेब, ही त्यांची मुले होत. त्यांच्या पत्नीचे नाव म्हाळसा बाई ह्या वनगोजी निंबाळकर यांची बहिण होत्या. स्वतः लखुजी जाधवांनी मध्यस्थी केल्या मुळेच वनगोजी ह्यांनी  आपली कन्या दीपा बाई मालोजी भोसले
ह्यांना दिली होती. अर्थात म्हाळसा बाई आणि दीपाबाई ह्या
दोघींचे आत्या नि भाची असे नाते होते. त्यामुळेच की काय
स्वतः लखुजी जाधवांनी आपल्या एकुलत्या एक कन्येच्या
बारशाला मालोजी राजे यांना आमंत्रित केले होते. त्या बारशाला
मालोजी राजे आणि त्यांची पत्नी उमाबाई ( दीपा बाई ) आपल्या चार पाच वर्षाच्या शहाजीला सोबत घेऊन आल्या
होत्या. शहाजी बाळाचा गोरा रंग सर्वांना दंग करून टाकणारा
होता. तजेलदार चेहरा, तरतरीत नाक, आणि डोळ्यातील
विलक्षण तेज हे राजबिंडे  रूप बारशाच्या कार्यक्रमात कौतुकाचा विषय बनला होता. आज पुन्हा रंगपंचमीच्या
निमित्याने दोघानाही  मलिक अंबर ने बोलविले होते. पुढे काय
झाले ते पहा.

    शहाजी महाराज

मार्च १५९९ ? – २३ जानेवारी १६६४). छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील व निजामशाही – आदिलशाहीतील एक मातब्बर सरदार. ऐतिहासिक कागदपत्रांत त्यांचा शाहजी किंवा स्याहजी असाही नामोल्लेख आढळतो. त्यांच्या जन्मतारखे विषयी एकमत नाही. बहुतेक तज्ज्ञ बिकानेर आणि जोधपूर येथील उपलब्ध जन्मपत्रिकांतील तारीख (१६ मार्च १५९९) ग्राह्य धरतात.भोसले घराण्यातील मालोजी व उमाबाई या दांपत्यापोटी शहाजींचा जन्म झाला. शरीफजी हा शहाजींचा धाकटा भाऊ. मालोजी हे निजामशाहीच्या नोकरीतील एक सरदार. भोसल्यांकडे हिंगणी, देऊळगाव, बेरडी इ. गावांची पाटीलकी होती. मालोजी १६१०-११ दरम्यान इंदापूर येथे झालेल्या एका लढाईत मारले गेले. तेव्हा निजामशाहीने मालोजींचा ‘मोकासा’ त्यांच्या मुलांना दिला. मालोजींचा भाऊ विठोजी यांनी मुलांचे संगोपन केले. पुढे विठोजींच्या मृत्यूनंतर (१६२३) शहाजी स्वतःच मोकाशाचा कारभार पाहू लागले. शहाजींचा पहिला विवाह निजामशाहीतील एक सरदार व सिंदखेडचे पिढीजात देशमुख लखूजी जाधव यांच्या जिजाबाई या कन्येशी झाला (१६०९). त्यांना सहा अपत्ये झाली.त्यांपैकी संभाजी व शिवाजी वगळता अन्य अपत्ये अल्पायुषी ठरली. संभाजी कर्नाटकात कनकगिरीच्या लढाईत (१६५४) मरण पावले. तुकाबाई आणि नरसाबाई या शहाजींच्या आणखी दोन बायका. शहाजींचे दुसरे लग्न मोहिते घराण्यातील तुकाबाईंशी झाले. त्यांचे पुत्र व्यंकोजीराजे पुढे तंजावरच्या गादीवर आले. शहाजींनी निजामशाहीचा वझीर मलिक अंबर याला सहकार्य करून आदिलशाहीविरुद्धच्या भातवडीच्या लढाईत पराक्रम केला (१६२४); मात्र त्यात त्यांचे भाऊ शरीफजी धारातीर्थी पडले. त्यानंतर मलिक अंबर आणि शहाजी यांच्या आपापसांतील मतभेदांमुळे शहाजी निजामशाही सोडून आदिलशाहीस मिळाले; परंतु १६२७ मध्ये इब्राहिम आदिलशाहच्या मृत्यूनंतर पुन्हा ते निजामशाहीत आले (१६२८).
निजामशाहीत सासरे लखूजी यांचा खून झाल्यानंतर शहाजी काही दिवस चाकण-पुणे परगण्यांत जाऊन राहिले आणि नंतर मोगलांकडे गेले. मोगलांनी त्यांना पाच हजारी मनसबदार नेमले; परंतु शाहजहान बादशाहाचा निजामशाही बुडविण्याचा हेतू लक्षात येताच शहाजींनी मोगलांना सोडून निजामशाही कुळातील एका मुलास गादीवर बसवून पेणगिरीस निजामशाहीची स्वतंत्र सत्ता स्थापन केली (१६३२). त्यासाठी त्यांनी विजापूरकरांशी मैत्रीचा तह केला. शहाजींनी दक्षिणेत नीरेपासून उत्तरेत चांदवडच्या डोंगरापर्यंतच प्रदेश आणि पूर्वेस अहमदनगरपासून पश्चिमेस उत्तर कोकणापर्यंतचा भाग आपल्या वर्चस्वाखाली आणला होता. निजामशाही टिकविण्याचे त्यांनी आटोकाट प्रयत्न केले; तथापि शाहजहानने अखेर निजामशाही खालसा केली (१६३६). त्यानंतर शहाजींनी आदिलशाहीत नोकरी धरली (१६३६). आदिलशहाने त्यांना ‘सरलष्कर’ व ‘महाराज’ या पदव्या दिल्या. आदिलशहाने त्यांच्याकडे असलेले पुणे-सुपे ही जहागीर तशीच ठेवली. त्यानंतर शहाजींनी प्रदेश विस्ताराचे धोरण अंगीकारून आपले वर्चस्व वाढविले. तेव्हा मुहंमद आदिलशहाने कर्नाटकात जहागीर देऊन तिकडे त्यांची रवानगी केली (१६३७).
कर्नाटकात पेनुकोंडे, बसवपटनम, होस्पेट, बिदनूर, श्रीरंगपटण वगैरे ठिकाणांच्या पाळेगारांविरुद्ध शहाजींनी मोहिमा आखून तो प्रदेश आदिलशाही अमलाखाली आणला (१६३७– ४८). या कामगिरीबद्दल त्यांना बंगलोरची जहागीर देण्यात आली. ते दुसरी पत्नी तुकाबाईंसह बंगलोरला राहू लागले. `महाराज फर्जंद शहाजी भोसले’ या किताबाने आदिलशहाने त्यांचा सन्मान केला. शिवाजींच्या स्वराज्यविषयक हालचालींमुळे आदिलशहा, मोगल व शहाजी ह्यांत वितुष्ट आले. शहाजी व शिवाजी यांचा बंदोबस्त करण्यासाठी शहाजी जिंजीच्या वेढ्यात गुंतले असता त्यांना २६ जुलै १६४८ रोजी अचानक कैद करण्यात आले.
शिवाजी महाराजांनी शाहजहानचा मुलगा मुराद याच्या मार्फत आदिलशहावर दबाव आणून शहाजींची सुटका केली (१६ मे १६४९). ह्या बदल्यात संभाजींना बंगलोर व शिवाजींना कोंडाणा (सिंहगड) आदिलशहाला द्यावे लागले. सुटकेनंतर शहाजींकडे पूर्ववत कर्नाटकचा कारभार सोपविण्यात आला. त्यांनी नलेंगापट्टम, पाटॉनोव्हो, तंजावर, वेल्लोर वगैरे गावे हस्तगत करून जणू स्वतंत्र राज्य निर्माण केले होते. कर्नाटकात कोलार, बंगलोर, अर्काट, बाळापूर व शिरे हे भाग त्यांना आदिलशहाकडून जहागीर म्हणून मिळाले. त्यांनी सर्व हिंदू पाळेगारांना एकत्र करण्याचा प्रयत्न केला.
मुद्‌गलचा पाळेगार जंजाप्पा नाईक व तंजावरचा जमीनदार पंचीरागू यांचे वैमनस्य होते. जंजाप्पाने शहाजींच्या मदतीने पंचीरागूचा पराभव करून त्याचा प्रदेश काबीज केला; पण पुढे दोघांत वितुष्ट आले. तेव्हा शहाजींनी जंजाप्पास बाजूला सारून तंजावर व मुद्‌गल येथील कारभार व्यंकोजींच्या स्वाधीन केला. अनेक विद्वान, कवी इ. शहाजींच्या आश्रयास होते. त्यांच्या अंगी पराक्रम, मुत्सद्दीपणा, धाडस आणि हिंमत होती; पण त्यांचे सर्व आयुष्य मुसलमानी सत्ताधाऱ्यांच्या सेवेत गेले. शिमोगा जिल्ह्यातील होदिगेरे येथे शिकारीस गेले असता घोड्यावरून पडून ते मरण पावले. व्यंकोजींनी होदिगेरे येथे त्यांच्या स्मृत्यर्थ वृंदावन बांधले. शिखर शिंगणापूर येथे त्यांच्या स्मृत्यर्थ एक प्रतीकात्मक वृंदावन आहे.
 

( शहाजी राजे नि जिजाबाई ह्यांच्या जीवनाविषयी  विस्तारित कथा सांगण्याचे कारण इतकेच की शिवाजी महाराजांच्या जीवनात ह्या दोंघांचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे. शिवरायांना घडविणाऱ्या राजमाता जिजाऊंचे  फार मोठे योगदान आहे,
हे सांगण्याचा छोटासा प्रयत्न )

       मालोजीचा मुलगा शहाजी व लखुजी जाधवांची मुलगी जिजाऊ हे लहानपणी एकत्र खेळत असत. एकदा निजाम शाही दरबारात रंगपंचमी खेळली जात होती. लखुजी जाधव आणि मालोजी राजे भोसले या दोन्ही कडील मंडळींना आमंत्रित केले होते. लखुजी जाधव , त्यांचे भाऊ आणि पुत्र शिवाय जिजाऊ होत्याच. तिकडून मालोजी राजे विठोजी राजे , शहाजी आणि शरीफ आणि विठोजीचा पुत्र संभाजी पण होता. मलिक अंबर, मिआन राजू  पण दरबारात उपस्थित होता. दरबारात सर्वांची ओळख करून देण्यात आली. त्यानंतर मालोजी म्हणाले की आता ओळख तर झालीच आहे तर रंगपंचमी जोरात होऊन जाऊ दे." त्यानंतर खरोखरच  रंगपंचमी खेळू लागले सर्वजण." तेव्हा मीआण राजू लखुजी राजे नि मालोजी राजे यांच्या सुप्यावर जाऊन त्यांना भेटून आला होता.अर्थात तो त्या दोघांना
ही आपल्या बाजूने करू इच्छित होता.ही गोष्ट मलिक अंबरला
समजली होती. म्हणून त्याने रंगपंचमी चे निमित्त साधून त्या
दोघांना आपल्या दरबारी बोलविले होते.जेणेकरून सत्य काय
आहे हे तर त्याला जाणून घ्यायचेच होते. म्हणूनच त्यांनी लखुजी जाधव यांना प्रश्न केला की, तुम्ही अगोदर कोणाच्या
बाजूने आहेत ते सिद्ध करा.मग पुढचं पाहू !"  त्यावर लखुजी जाधव न समजून म्हणाले," मी समजलो नाही आपल्याला काय म्हणावयाचे आहे ते." त्यावर खुलासा करत एकजण म्हणाला, " लखुजी राजे, हुजूर  हे जाणून घेऊ इच्छित आहेत की आपण हुजुरच्या बाजूने आहात का मीआन राजू च्या बाजूने. कारण मीआन राजू तुमच्या सुभ्याला येऊन तुम्हाला भेटून गेल्याची खबर वजीरे आलमला  लागली आहे, म्हणून ते असं विचारत आहेत." मलिक अंबर म्हणाला," लखुजी राजे, अगर आप उनके यहां जाना चाहते है, तो अवश्य जाइए हम आपको रोकेंगे नहीं, आप बुजुर्ग है, और समझदार भी है, इसलिए हम आपको क्या समझाएंगे लेकिन एक बात जरूर है की सब मराठा सरदार उनके पास जायेंगे तो हमे मंजूर  नहीं है ।" तेव्हा लखुजी जाधव म्हणाले," आम्ही सदैव आपल्याच बाजूने आहोत विश्वास ठेवा आमच्यावर." त्यावर मीआन राजू म्हणाला की, कासिम खान मालोजी राजे को निमंत्रण दिया हैं ना ?" कासिम खान बोलला की, हां हुजूर मैने श्रीपाद को भेजा था .वो तो सुनकर हैराण हो गये, आते ही होंगे ." दोन्ही प्रतिस्पर्धी मालोजी राजे ना आपल्या कडे खेचू पाहत होते. अर्थात मलिक अंबर आणि मीआन राजू ने स्वतः मालोजी चा सुप्याला जाऊन भेट घेतली. थोड्या वेळाने मालोजी राजे आपल्या बंधू सह तेथे आले. परंतु मलिक अंबरची भेट घेतली.याचा अर्थ लखुजी जाधव आणि मालोजी भोसले  मलिक अंबरच्याच बाजूने उभे राहिले. त्यानंतर रंगपंचमी खेळ सुरू झाला. तेव्हा मालोजी राजे आणि लखुजी राजे  यांनी आपाआपल्या पुत्रांची ओळख करून दिली. जसे की जिजा, बहादुर राजे, राघोजी राजे, अचलोजी राजे आणि तिथं फक्त दत्ताजी राजे  उपस्थित नव्हता. ही झाली लखुजी राजेंची मुले, आता मालोजी राजे आपल्या पुत्राची ओळख करून देताना म्हणाले की, शहाजी, शरीफजी, मंबाजी राजे,  खेलोजी राजे , कबाजी, नागोजी, परसोजी त्रिंबकजी , ककाजी आणि संभाजी राजे बाहेर कुठं तरी आहेत. त्यावर लखुजी राजे म्हणाले," आता झाली ना ओळख मग लावा की एकमेकांना रंग." असे म्हणताच सर्वजण एकमेकांना रंग लावू लागले. जिजाऊनि शहाजी राजे ना रंग लावला. मग शहाजी राजेंनी देखील जिजाऊंच्या गालाला रंग फासला. त्यानंतर ते दोघेही एका जागी बसून गप्पा मारू लागले. तेवढ्यात संभाजी आणि दत्ताजी राजे या दोघांची गाठभेट झाली. दोघेही एकमेकावर चाल करण्याच्या तयारी होते. इतक्यात तेथे  जगदेव राव आले त्यामुळे दोघेही काही झालंच नाही अश्या पद्धतीने एकमेकांना रंग लावतात नि तेथून निघून जातात.

 
     रंगपंचमी खेळत असता शहाजी आणि जिजाबाई दोघांनी एकमेकांना रंग लावला आणि दोघेही एकत्र बसून वार्तालाप करत असता लखुजी जाधवांनी ते पाहिलं नि सहजच बोलून गेले की जोडा किती छान दिसतोय." ते मालोजीनी  ऐकले नि हसत त्यांच्या जवळ येत म्हणाले,
  " म्हणजे जाधवांची नि भोसल्यांची सोयरिक होणार तर , अर्थात तुम्ही आमचे व्याही होणार आणि जिजाबाई आमच्या सूनबाई होणार." असे ते सहजच म्हणून गेले. पण  लखुजी जाधव मात्र गडबडले. ते म्हणाले, " आपला काहीतरी गैरसमज होतोय. मी सहजच थट्टेने म्हटले ." त्यावर मालोजी सुध्दा हसून म्हणाले," तुम्ही एवढे
मनावर का घेता ? मी देखील थट्टेनेच म्हणालो. परंतु आपल्या व्यतिरीक्त अन्य लोक सुध्दा दरबारात आहेत, त्यापैकी कुणी बादशहाला जाऊन सांगितले तर   ? तुम्हीच त्याचे उत्तर द्या म्हणजे झाले. त्यावर लखुजी जाधव काहीच बोलले नाहीत. कारण त्यांना त्यांची चूक ध्यानात आली होती. परंतु धनुष्यातून निघालेला बाण आणि तोंडातून निघालेला शब्द परत थोडाच घेतला जाणार आहे, म्हणून माणसाने बोलतानाच तोलून मापून बोलायचे असते. म्हणजे अशी गत होत नाही कधी ! लखुजी जाधव कार्यक्रम संपेर्यंत तिथं न थांबता आपल्या मुलांना घेऊन तेथून आपल्या शिबिरात निघून ही गेले. त्यानंतर मालोजी राजे देखील आपल्या निवास्थानी निघून गेले. परंतु लखुजी जाधवां च्या त्या वक्तव्याने मलिक अंबर आणि मीआन राजू मध्ये मात्र  जुंपली. म्हणजे मलिक अंबर ना वाटत असतं की लखुजी राजे जाधव आणि भोसले मध्ये सोयरिक झाली पाहिजे . परंतु मीआन राजूची  इच्छा असते की त्या दोघांमध्ये सोयरिक होऊ नये. कारण ते त्याच्या साठी योग्य ठरले नसते. म्हणजेच काय मलिक अंबर ची ताकद एकदम वाढली असती , आणि मुळात मीआन राजू ला तेच नको हवं असतं  आणि त्यांच्या शेजारी त्याला भडकवीत राहणारी माणसे होतीच की  आता पुढे काय झालं ते पहा.

    लखुजी सदरे वरून थेट आपल्या शिबिरात निघून आले
जिजाऊ ना काही कळेना की नमके काय घडले. त्यांनी आपल्या आबासाहेबाना विचारले देखील की , काही झालंय का ? नाही म्हणजे आमचे काही चुकलेय का ?" लखुजी उत्तरले," नाही." त्यावर जिजाऊ उद्गारल्या की,"  मग असे तडकाफडकी का निघून आलोय आपण ?" तेव्हा लखुजी राजे त्यांची समजूत काढण्यासाठी ते म्हणाले," हे बघ जिजा आपण मोठी माणसं , म्हणून मोठ्यानी मोठ्या माणसासारखे वागायचे असते. आम्ही  त्यांच्या सोबत रंगपंचमी खेळलोय इतकं पुरेसे नाहीये का ?" असे विषय तिथच संपवण्यासाठी ते म्हणाले.
  " बरं आम्ही निघायचं का ?" धाकट्या राणी ने विचारले.
  " हो." असे बोलून किंचित थांबून  लखुजी जाधवांनी जिजाऊंना विचारले की, " जिजा थांबा. मला काहीतरी
विचारायचे आहे तुम्हाला." त्यावर जिजा उद्गारल्या की, मग
विचारां ना काय विचारायचं ते." त्यावर लखुजी जाधव बोलले
की , शहाजी आणि तुम्ही  इतकं काय बोलत होते ?" त्यावर
जिजा म्हणाल्या," काही नाही ते देखील आमच्या सारखेच कंटाळलेलेच असावेत. म्हणून ते तसे म्हणाले असावेत की गंगा गए गंगादास और जमना गए जमनादास आपण जिथं जावं तिथं तिथल्या रिवाजा नुसार सारखेच वागावे. म्हणून मी म्हटलं की, जनाब की आदब और फरमारी से हमे यकीन हुआ था की आप वेरुल के भोसले ही होंगे ।"  त्यावर धाकट्या राणी सरकार म्हणाल्या," जिजाऊ तुम्ही असं म्हणालात ?" त्यावर जिजाऊनी होकारार्थी आपली मान डोलावली. तेव्हा जगदेव राजेंनी विचारले, जिजाऊ तुम्ही या भाषेत बोललेत ?"
   " हां आम्ही इथं दौलताबादला आल्यापासून काझी कडून
अरबी, उर्दू, फारसी भाषा थोड़ी थोड़ी शिकून घेतली."
   " ते का बरं ?"
   " आपण जिथं जिथं जाणार तिथली थोडी तरी भाषा
आपल्याला यायला पाहिजे की नको ? म्हणून शिकून घेतली."
  " अगदी बरोबर ." जगदेव राजे उद्गारले.
  " बरं आता जा नि आराम करा थकला असाल ना ?"
जिजाऊ आपल्या धाकट्या आऊ साहेब सोबत निघून गेल्या.

  दुसऱ्या दरबारात जाण्याच्या तयारीने लखुजी जाधव राज वस्त्रे
घालून बाहेर आले नि त्यांनी जगदेव राव ना हांक मारत म्हणाले
की," जगदेवां झाली का तयारी ?" लखुजी जाधव उद्गारले.
   " हां दादासाहेब." जगदेव तिथं येत म्हणाला. तसे लखुजी
जाधव म्हणाले," मग चला वजीरे आलम ला भेटून येऊ." ते दोघेही बंधू निघालेच होते तोच जिजा आणि त्यांच्या धाकट्या आऊ साहेब लखुजी जाधव समोर  येतात नि त्यांना मुजरा करतात. तसे लखुजी जाधव उद्गारले की आम्ही वजिरे आलम ला भेटून येतो म्हटले." तेव्हा जिजा म्हणाल्या की, आबासाहेब, आम्ही यायचं का आपल्या सोबत ?" लखुजी उद्गारले, " तुम्ही कशाला ? आम्ही जाणार नि लगेच भेटून निघणार."
  " आम्ही पण येतो ना ?"
   " जा त्यांना पण घेऊन केव्हाचा तयारी करून बसल्या आहेत त्या ."
   " बरं चला." असे बोलून ते आपल्या पत्नीला म्हणाले,
   " तयारी करून ठेवा आम्ही आलोच लगेच."
   " बरं." असे बोलून ते तिघेही निघून गेले.

.
       मालोजी राजे, विठोजी राजे आणि शहाजी राजे मलिक
अंबरला भेटायला दरबारात आले प्रथम मालोजी राजे ने मलिक अंबर ला मुजरा केला. त्यानंतर विठोजी ने मुजरा केला नि शेवटी शहाजीनी मुजरा केला. तेव्हा मलिक अंबर म्हणाले की, मालोजी, आम्हाला नंतर भेटा आमचं तुमच्याकडे थोडेसे काम आहे." असे बोलून ते पुढे म्हणाले," मालोजी यह आपका बेटा शाहजी है ना?" शहाजी ने चटकन उत्तर देत म्हटले की हां मैं ही शहाजी हुं !" मलिक अंबर त्यांच्या कडे निरखून पाहत म्हणाला," माथे पे चंदन का तिलक तुम्हे पता है, चंदन के पेड़ से सांप लीपट कर रहता है ।"
    " हां पता है।"
    " फिर भी उसे अपने माथे पर रखते हो !"
    " यह तो देखने वाले की नजरयां है । हमारे लिए तो यह
चंदन एकदम पवित्र है ।"
   " वो कैसे ? देखने से क्या चीज बदल जाती है ?"
   " जी हां, हमे पत्थर में शिवलिंग दिखता है, तो किसी को
शिवलिंग में पत्थर दिखाई देता है ।"
   " छोटे मियां तुम तो आग से भी तेज हो ।"
   " जी नहीं आग से ज्यादा तेज क्रोध होता है ।"
   " उर्मी से काला कौन है ?"
  " कलंक ....ज्यादा काला होता है,  कलंक से ज्यादा काला कुछ भी नहीं."
    " बहुत खूब ! जैसे तलवार चलाते हो, वैसे ही जुबान. जंग में
कौन सा शस्त्र सबसे बड़ा   है ?"
    " हिम्मत." शहाजी राजेंनी दिलेले उत्तरे ऐकून मलिक अंबर
ला त्यांची प्रशंसा केल्या वाचून राहवले नाही. ते म्हणाले की,
    " वाहवा मालोजी राजे क्या हूनर पाया है, बेटे एक बात याद रखना, सबकुछ छीना जा सकता है, लेकिन किसिका  हुनर नहीं।" असे बोलून त्यांना बाजूला जाऊन राहण्याची खुण केली. तसे ते बाजूला जाऊन उभे राहिले. तसे इतर ही मनसबदार आपापले नजराने घेऊन वाजिरे आलमला देवू लागले. इतक्यातच लखुजी जाधव, जगदेव आणि जिजाबाई तेथे आल्या. लखुजी जाधवांनी आणलेल्या नजराणा वजीरे आलम समोर करताच त्यांनी त्या नजराणा ला स्पर्श केला. तसा एकजण पुढे आला नि ते ताट घेऊन गेला. त्यानंतर त्या दोन्ही बंधूनी वजीरे आलमला मुजरा केला. पण जिजाबाईंनी काही त्यांना मुजरा केला नाही. तेव्हा मलिक अंबर ने विचारले की, बेटी आपला नाम क्या है ?"  तेव्हा जीजाऊंनी  उत्तर दिले की , जिजा  लखुजी राजे जाधव...." तसे लगेच मलिक अंबर ने विचारले की जिजा का  मतलब क्या होता है ?" जिजाबाई निर्भय पने म्हणाल्या, जिजा का मतलब हैं फतेह ! यह रेणुका माता का नाम है . जिजा का मतलब जीत और उसे ही फतेह कहा जाता है ।" मालिक अंबर ने विचारले की, जीत कैसे होती है ?" त्यावर जिजाऊ उद्गारल्या की,  "   फैसलोंसे."
  " फैसले से या फासले से ?"
  " जी नहीं फैसलोंसे.....  फासले अलग है, फासले अपने अपने सोच से माफे जा सकते है ।"
   " फ़ैसलो से क्या चीज बदल जाती है, ताज्जुब है ।"
   " जिहां ! असल में जो चीज फासले पर है, अपनी सोच
उस फासले को मिटाकर उसे करीब ला सकती है।" मलिक अंबर ने त्यांना बाजूला जाण्याचा इशारा केला. लखुजी जाधव जगदेवला म्हणाले," जिजाऊ ना मागे घे." तसे मलिक अंबर म्हणाले," सुना है, आपने जुबान दी है ।"
  " कैसी जुबान ?"
  " यहीं आपकी बेटी और मालोजी राजे का बेटा."
  " नहीं नहीं sss"
   " दोनो हमारे सामने हो. आपकी बेटी सोच में आगे है , और
मलोजी का बेटा नजर से आगे है, जोड़ी अच्छी जमेगी ।"
   " नहीं नहीं sss ?"
   " सोच लो sss " मालिक अंबर उद्गारला. पण लखुजी
जाधव अखेरपर्यंत नाहीच म्हणाले. त्यानंतर लखुजी जाधवांनी
मुजरा केला नि तिकडून निघाले. त्यांच्या पाठोपाठ मालोजी
राजे पण निघाले.

    रंगपंचमी खेळून जिजाबाई घरी आल्या. परंतु त्यांच्या
डोळ्यासमोरून ते दृश्य काही जात नव्हतं. बादशहाच्या
दरबारात लखुजी जाधव यांनी बादशहा घातलेला मुजरा
जिजाऊ ना काही आवडला नाही. नाही म्हणजे आतापर्यंत त्यांनी आपल्या आबासमोर इतरांना मुजरे घालताना पाहिले होते.पण आज चक्क त्यांचे आबासाहेब आणि काकासाहेब सरळ  बादशहाला मुजरा घालत होते. त्यांनी  मात्र बादशहाला मुजरा घातला नाही. उलट त्या आपल्या काकांना म्हणाल्या की, 
"  काकासाहेब, तो बादशहा वयाने किती लहान आहे, त्याला
आबासाहेब सारख्या मोठ्या माणसांनी का बरं मुजरा
घालायचा ?" त्यावर जयदेव जिजाऊंना समजावत म्हणाले,
   " जिजा हा दरबारात ला नियम आहे. मुजरा घातलाच पाहिजे." तेव्हा जिजाबाईंनी विचारले," पण का घालायचा असतो मुजरा ?" त्यावर तिचे काका म्हणाले," तो बादशहा आहे , नि आपण त्याचे चाकर आहोत." पण जिजाबाईंना ते काही पटले नाही. त्या घरी तर आल्या. पण त्यांचे चित्त धाऱ्यावर नव्हते. त्यांच्या पुढे एकच प्रश्न दत्त म्हणून उभा होता. पण त्यांचे चाकर कसे काय ? कारण आपण यादव वंशी म्हणजे भगवान श्रीकृष्णांचे वंशज आहोत. पुढे यादव नावाचे रूपांतर जाधव मध्ये झाले. हे जरी खरे असले तरी आपला वंशज तर भगवंत श्रीकृष्णाचां आहे, मग राजे असताना चाकर कसे बनलो ? हा विषय काही त्यांच्या डोक्यातून जात नव्हता. त्या एकदम गप्प झाल्या. कुणाशी बोलत नव्हता. परंतु कोणत्यातरी विचारत गर्क आहेत, हे मात्र त्यांच्या चेऱ्यावरचा चिन्हा वरून स्पष्ट पने जाणवत होते. तिच्या आऊ साहेबांनी त्यांना विचारले,
   "  जीजा एवढा कसला विचार करता आहात ?" त्यावर जिजाबाईंनी उत्तर दिले की, नाही कसला ?" त्यावर त्याच्या आऊ साहेबांनी विचारले की, नाही कसा , मी मघाच पासून पाहते आहे, तुमचं ध्यान कशात ही नाही, तुम्ही धड जेवत ही नाही.  काही झालंय काय ? म्हणचे  तुम्हाला कुणी काही बोललय काय ?" पण त्यांनी काहीच उत्तर दिले नाही. तेव्हा त्यांच्या वडिलांनी अर्थात लखुजी जाधवांनी विचारले की, आमच्या कडून काही चुकलंय का ?" त्यावर जिजाबाई उद्गरल्या की, होच मुळी आपल्या कडूनच चुकलंय ." असे म्हणताच जिजाऊंच्या आऊ साहेब त्यांच्या वर रागवत म्हणाल्या की, बोलायला संधी म्हणून काय पण बोलू नकोस." तश्या जिजाबाई चिडून म्हणाल्या," मग कशाला विचारलेस मला. मी तुला सांगितले होते का ? मला प्रश्न विचार म्हणून. तेव्हा लखोजी जाधव म्हणाले की,तुम्ही कुणी ही मध्ये बोलू नका. जिजा जर माझ्यावर रुसल्या आहेत तर त्याचे कारण मला जाणून घ्यावेच लागेल ना ? तेव्हा तुम्ही साऱ्यांनी गप्प बसा." असे बोलून ते जिजाबाई कडे पाहत म्हणाले," सांग बरं काय अपराध घडलाय आमच्या कडून ?" तेव्हा जिजाबाईंनी त्यांच्या मनात असलेले त्यांनी सांगून टाकले. ते ऐकून लखुजी जाधव म्हणाले की,आम्ही जहागीरदार असलो तरीही बादशहाचे चाकरच आहोत. एके काळी आम्ही राजे होतो हे खरंय ; परंतु आता आम्ही चाकर बनून राहिलो. कारण परकियांनी आपली सत्ता बळकावली. आता फक्त त्या जुन्या आठवणी राहिल्यात." त्यावर जिजा बाईंनी विचारले," का आता आपण राजे बनू शकत नाही का ?" असे बोलून आपल्या मोठ्या बंधू कडे पाहून त्यांनी दत्ताजी ना विचारले," दादासाहेब, तुम्हाला राजा बनलेले आवडणार नाही का ? मला आबासाहेबाना राजे झाल्याचे पाहायचे आहे, आणि आबासाहेब समोर त्या लोकांना मला मुजरे करताना पहायचंय." त्यावर लखुजी जाधव म्हणाले," नाका पेक्षा मोती जड असून चालत नाही जिजा ! माणसाने आपली पायरी ओळखून रहावे. उगाच नको ती स्वप्न पाहू नयेत." त्यावर जिजाबाई म्हणाल्या,
"  नाही आबासाहेब, मी आपल्या या  मताशी सहमत नाहीये. माणूस स्वप्नानेच तर मोठा होतो. स्वप्नच पाहिलं नाही ते पूर्ण करण्याची जिज्ञासा तरी कुठून निर्माण होणार आपल्या मध्ये, म्हणून अगोदर स्वप्न पाहणे सर्वात जास्त जरुरीचे आहे. आणि आबासाहेब तुम्हीच म्हणाला होता ना, की आपले राज्य चंद्राच्या कला प्रमाणे कमी कमी होत गेलं नि शेवटी अमवाश्या आली. पण आमवश्या नंतर पौर्णिमा पण येते मग चंद्रकोर वाढत पण जातो मग आपण का वाढू शकत चंद्रकोर प्रमाणे ?" त्यावर लखोजी जाधव इतकंच म्हणाले," होईल ना ? पण आता नाही पुढच्या पिढीत."
   " दादासाहेब , आपले काय म्हणणे आहे ?"
   " जिजा पुढच्या पिढीत नक्की होईल हं !" फक्त इतकेच
म्हणाला. मग जिजा ने दुसरा भावाला विचारले. पण तो काही
बोललाच नाही. मग तिसऱ्या भावाला ही विचारले. तो ही काही
बोलला नाही. कदाचित जिजाबाईंच्या प्रश्नांचे उत्तर कोनापाशी
नव्हते. त्यावर जिजाऊ च्या   आऊ साहेब मध्येच बोलून विषय संपविण्याचा प्रयत्न म्हणाल्या," जिजा , उगाच वाद घालू नका.
जी गोष्ट अशक्य आहे, त्या बद्दल काही बोलू नका. मी असं
म्हणत नाहीये की तुम्ही चुकीचे बोलताय पण ते शक्यच नाहीये.
निदान आपल्याला तर नाहीच नाही." त्यावर जिजाबाई पेटून
उठल्या नि म्हणाल्या," मग काय आपण कायम मुजराच
करायचा का ? आणि ते पण बाहेरून आलेल्या लोकांना ?
आपल्याला बादशहा कधीच व्हायचे नाही ? मला नाही पटत
हे." असे बोलून त्या तावातावाने जाऊ लागतात.तश्या त्यांच्या
आऊ साहेब त्यांना आपल्या डोळ्यांनी दटावून सांगतात की
असं करू नका." त्यावर जिजाबाई म्हणाल्या," मला भूक
नाहीये, ताटात जे वाढलं होते, ते संपवले आले, अजून नकोय
मला " असे म्हणून त्या चालत्या झाल्या.सर्वजण त्याच्या
पाठमोऱ्या आकृतीकडे पाहतच राहिल्या. कारण त्यांच्या
प्रश्नाचे उत्तर कोणापाशी पण नव्हते. जेवणे उरकल्या नंतर
जेव्हा त्या आपल्या शयन गृहात गेल्या तेव्हा त्यांना लखुजी
विचारमग्न दिसले.

क्रमशः





Comments

Popular posts from this blog

Chhatrapati Shivaji Maharaj | छत्रपती शिवाजी महाराज | भाग 6 | Mahendranath Prabhu

Chhatrapati Shivaji Maharaj | छत्रपती शिवाजी महाराज | भाग 4 | Mahendranath Prabhu